AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हुsssssश! अखेर मे महिन्यात उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा मिळणार, 109% पूर्वमोसमी पावसाचा अंदाज

Weather Update : येत्या महिन्यात गोवा, कर्नाटक या राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी, तर पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे.

हुsssssश! अखेर मे महिन्यात उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा मिळणार, 109% पूर्वमोसमी पावसाचा अंदाज
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: TV9
| Updated on: May 02, 2022 | 7:43 AM
Share

पुणे : संपूर्ण एप्रिल महिन्यात महाराष्ट्राचं तापमान (Maharashtra weather update) तापलेलं होतं. सगळ्यांनाच घामाच्या धारा लागल्या होत्या. अशातच मे महिन्यातही उकाडा कायम राहतो की काय? अशी भीती होती. मात्र, मे महिन्यात (May Month 2022 Temperature) कडाक्याच्या उन्हापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यताय. महाराष्ट्रात मे महिन्यात तापमान एप्रिलच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे. मे महिन्यामध्ये बहुतांश भाषात कमाल तापमान सरासरीच्या खाली राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान खात्यानं (Weather department) वर्तवला आहे. पूर्वमोसमी पाऊस सरासरीपेक्षा अधिक होणार असल्याचंही भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून करण्यात स्पष्ट करण्यात आलंय. देशपातळीवर उत्तर-पश्चिम राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार असून संपूर्ण देशात पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 109 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यामुळे आता सगळ्यांचीच नजर ही मॉन्सूनच्या पावसाकडे लागली आहे.

मे महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यात तापमान कमी राहिल. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार चालू महिन्यात कमाल तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहिल तर किमान तापमान थोडं अधिक राहणार आहे. तसंच पूर्वमोसमी पावसामुळे राज्यातील उन्हाच्या झळांची तीव्रता कमी होईल, असंही सांगण्यात आलंय.

दरम्यान, येत्या महिन्यात गोवा, कर्नाटक या राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी, तर पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. मे महिन्या महाराष्ट्रासह या राज्यातही उन्हाची तीव्रता कमी असणार आहे.

अमरावतीत उष्माघाताचे 3 बळी

दरम्यान, अमरावतीत उष्माघातानं तिघांचा बळी घेतलाय. अमरावतीचं तापमान अक्षरशः लोकांना भाजून काढतंय. पारा 46 अंशांच्या पार गेला आहे. उच्चांकी तापमानामुळे तिघांनी जीव गमावल्याचंही समोर आलंय. सुभाष मोहनसिंह नोतात, जयसिंह चंदनलाल मडावी अशा मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत.

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.