Western Maharashtra Rain Updates : आधी कोरोनाचं संकट, आता अवकाळ पाऊस, शेती उद्ध्वस्त, शेतकरी हतबल

Western Maharashtra Rain Updates : आधी कोरोनाचं संकट, आता अवकाळ पाऊस, शेती उद्ध्वस्त, शेतकरी हतबल
सांगलीत अवकाळी पाऊस

राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झाल्याचंही समोर येतंय.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Feb 19, 2021 | 1:52 AM

पुणे : राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झाल्याचंही समोर येतंय. सांगलीत झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे सावळज गावात द्राक्षाची बाग पडून लाखो रुपयांचं नुकसान झालंय. अहमदनगरमध्ये देखील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी पडल्या. हवामान खात्याने आधीच अशा पावसाचा अंदाज वर्तवला होता. उद्या (19 फेब्रुवारी) देखील आभाळाचं वातावरण राहिल असा अंदाज वर्तवण्यात आलाय (Western Maharashtra Rain Updates Unseasonable rain in western Maharashtra farmers crop destroy).

सांगली जिल्ह्यातील अनेक भागात द्राक्ष बागांचे लाखो रुपयांच नुकसान झाले आहे. सावळजमध्ये तीन बागा पडल्या आहेत. काढणीला आलेल्या द्राक्षाचं मोठं नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी द्राक्ष बाग कोसळली आहे. तर, अनेक ठिकाणी द्राक्ष पिकांवर या पावसामुळे परिणाम झाला आहे. द्राक्षाचे मनी कुजण्याचं प्रमाण वाढलं आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांच नुकसान झाले आहे. सावळज मधील राहुल विष्णू माळी या शेतकऱ्याची द्राक्ष बाग कोसळली आहे. त्यामुळे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी केली आहे.

आधीच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कंबरडं मोडलेल्या शेतकऱ्यावर अवकाळी पावसाने मोठा आघात केलाय. कोलमडलेल्या आर्थिक गणितात कसाबसा उभा राहिलेला शेतकरी या अवकाळी पावसामुळे भुईसपाट होत आहे. मोठ्या कष्टाने उभी केलेली पिकं शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर या अवकाळी पावसात उद्ध्वस्त होत आहेत.

पुण्यातही पावसाचा इशारा

पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या शुक्रवारपर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहणार असून दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर शहर आणि परिसरात हवामान कोरडं राहिल. यामुळे पुणेकरांनी आणि घाटमाथ्यावरील गावांनी काळजी घेत आपल्या शेतमालाचीही काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

कोणत्या भागांमध्ये कधी पाऊस?

18 तारखेला मध्य-महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र, 17 तारखेच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची तीव्रता तसेच क्षेत्र कमी होईल. 19 तारखेला काही प्रमाणात आभाळी हवामान राहील, परंतु हवामानात स्थिरता यायला सुरुवात होईल, आणि 20 तारखेपासून राज्यात हवामान पूर्णपणे स्थिर होईल (Sangli Grapes Garden Destroyed).

शेतकऱ्यांनी नियोजन करावं आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावं

शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे. तसेच वादळ आल्यास लोकांनी झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा :

सांगलीत अवकाळी पावसामुळे सावळज गावात द्राक्षाची बाग पडली, लाखो रुपयांचं नुकसान

Pune Weather : पुणेकरांसाठी हवामान खात्याकडून इशारा, ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता

व्हिडीओ पाहा :

Western Maharashtra Rain Updates Unseasonable rain in western Maharashtra farmers crop destroy

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें