VIDEO: राणे साहेबांनाही अटक झाली होती, त्यांचा राजीनामा घेतला का?; शरद पवारांचा भाजपला खरमरीत सवाल

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजपकडून मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपची ही मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फेटाळून लावली आहे.

VIDEO: राणे साहेबांनाही अटक झाली होती, त्यांचा राजीनामा घेतला का?; शरद पवारांचा भाजपला खरमरीत सवाल
राणे साहेबांनाही अटक झाली होती, त्यांचा राजीनामा घेतला का?; शरद पवारांचा भाजपला खरमरीत सवालImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 2:23 PM

पुणे: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजपकडून (bjp) मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपची ही मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी फेटाळून लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचे जुने सहकारी राणे साहेब यांनाही अटक करण्यात आली होती. त्यांना मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय तुम्ही घेतला हे माझ्या पाहण्यात आलं नाही. उद्या पंतप्रधान पुण्यात येतील तेव्हा ते कदाचित याचा खुलासा करतील, असा टोला लगावतानाच एक न्याय राणेंना लावता अन् दुसरा न्याय मलिकांना लावता याचा अर्थ हा सर्व राजकीय उद्देशाने सुरू केलेला उद्योग आहे, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी भाजपवर केली. शरद पवार हे पत्रकार परिषदेत बोलत होते.

नवाब मलिक यांना राजकीय हेतूने अटक केली. गेली 20 वर्ष ते विधानसभेत आहेत. त्या काळात त्यांच्यावर कधी आरोप झाले नाहीत. आता त्यांचे संबंध दाऊदशी असल्याचा दिसतोय. एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला तर त्याला दाऊदचा जोडीदार धरलं जातं. कारण नसताना आरोप केला जातो. मला त्याची चिंता नाही. कधीकाळी माझ्यावरही आरोप केले होते. हे लोक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मला चिंता करण्याचं कारण नाही. नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जातेय. त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांना यातना दिल्या जात आहेत. जाणूनबाजून हे केलं जातंय, असं शरद पवार म्हणाले.

ओबीसींसाठी सर्व काही करू

यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केलं. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात काय झालं मला माहीत नाही. कायदा केला असेल नसेल तरीही ओबीसींच्या हिश्याचं देण्यासाठी आम्ही जे जे करता येईल ते करू, असं त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यपालांबद्दल न बोललेचं बरं

पवारांनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही टीका केली. यशवंतराव चव्हाण यांच्या काळात सी. प्रकाश नावाचे राज्यपाल होते. त्यावेळी मी कार्यकर्ता होतो. नंतर मी पीसी अलेक्झांडर या राज्यपालांचं कामही पाहिलं. हे दोन्ही राज्यपाल कर्तृत्वान होते. पण आताचे राज्यपाल या यादीत कुठे दसित नाहीत. त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं, असा टोला पवार यांनी राज्यपालांना लगावला.

सत्ताधाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वाचवलं पाहिजे

युक्रेन-रशिया युद्धावरही भाष्य करतानाच युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय मुलांना मायदेशी आणण्याचं आवाहनही त्यांनी केंद्र सरकारला केलं. युक्रेन हा वेगळा देश आहे. सुंदर देश आहे. मी युक्रेनला दोनदा तीनदा गेलो होतो. पुणे जसं शिक्षणाचं माहेर घर आहे. तसं युक्रेन शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं म्हणून विद्यार्थी युक्रेनला शिकायला जातात. रशिया युक्रेनच्या युद्धात स्थानिकांना मोठी किंमत मोजावी लागत आहे.

माझं केंद्र सरकारशी बोलणं झालं. केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. जे जे करता येईल ते ते केंद्र सरकार करत आहे. पण तरीही विद्यार्थ्यांची तक्रार आहे. युक्रेनच्या सीमेच्याबाहेर येता येईल असा निर्णय घ्या, असं आपल्या दुतावासाने या विद्यार्थ्यांना सांगितलं. पण विद्यार्थ्यांशी बोलल्यावर त्यांच्या काही अडचणी समोर आल्या आहेत. पाच ते सहा तास चालावं लागेल इतक्या अंतरावर सीमा आहेत. जायला आमची तयारी आहे. पण भयंकर थंडी आहे. गोळीबार सुरू आहे. आम्ही कसं जाणार? असं विद्यार्थी म्हणत आहेत. त्यामुळे ते युक्रेनमध्ये अडकले आहेत. म्हणून या संकटात कुणी काय केलं? काय नाही याची चर्चा करण्याची वेळ नाही. या मुलांना कसं वाचवलं पाहिजे यावर लक्ष देण्याची गरज आहे, सत्ताधाऱ्यांकडून अधिक आहे. देशाची सूत्रे ज्यांच्याकडे आहेत ते गांभीर्याने भूमिका घेतील असं समजू या, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

संकटात कुणी काय केलं याची चर्चा नको, अडकलेल्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न हवेत, शरद पवारांचा पंतप्रधानांना सल्ला!

NCP Sharad Pawar | पंतप्रधान पुण्यात येताहेत त्यांचं स्वागत, पण ढगफुटी झाली तर आपल्यालाच बघायचं आहे; शरद पवारांचा मोदींना खोचक टोला

Maharashtra News Live Update : संकटात कुणी काय केलं याची चर्चा नको तर अडकलेल्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न हवेत, शरद पवारांचा पंतप्रधानांना सल्ला!

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.