जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात दक्षिण कमांडकडून दीड लाख रोपांची लागवड, 1 लाख बियाही विखुरल्या

सागर जोशी

|

Updated on: Jun 05, 2021 | 3:47 PM

दक्षिण कमांडकडून 136व्या प्रादेशिक सेनेच्या( पर्यावरणीय) माध्यमातून दीड लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात दक्षिण कमांडकडून दीड लाख रोपांची लागवड, 1 लाख बियाही विखुरल्या
दक्षिण कमांडकडून पुण्यात दीड लाख रोपांची लागवड

Follow us on

पुणे : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पुण्यामध्ये दक्षिण कमांडकडून 136व्या प्रादेशिक सेनेच्या( पर्यावरणीय) माध्यमातून दीड लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एक लाख बिया (सीडबॉल्स ) खुल्या जागांवर विखरून टाकण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेमुळे पुण्यातील विविध ठिकाणी 100 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळाचे रुपांतर हरित क्षेत्रांमध्ये होणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे दक्षिण कमांडचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. (Planting of 1.5 lakh saplings by Southern Command in Pune)

अशा प्रकारचे उपक्रम पुण्यामध्ये आधीपासून हाती घेण्यात आले असून हे उपक्रम बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप(दिघी), कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग( खडकी), राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (खडकवासला), सीओडी( देहू रोड) येथे सुरू आहेत. या मोहिमेअंतर्गत 1.5 लाख रोपांची लागवड, एक लाखांपेक्षा जास्त सीडबॉल्स जमिनीवर विखुरून टाकणे आणि 12.2 लाख लिटर पर्जन्यजलाची साठवण करू शकणाऱ्या 2500 चौरस मीटर आकाराच्या जलाशयाच्या निर्मितीचा समावेश आहे. सध्याच्या मान्सूनच्या हंगामात ही मोहीम चालवली जाणार आहे.

दरवर्षी 2-3 लाख रोपांची लागवड

दक्षिण कमांडच्या 11 राज्यांमधील विविध कॅन्टॉन्मेंटमध्ये(छावणी क्षेत्रात) दरवर्षी 2-3 लाख रोपांची लागवड केली जाते. महाराष्ट्रातील विविध प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या महत्त्वाच्या वनीकरण मोहिमेमध्ये 136व्या प्रादेशिक सेनेने 200 हेक्टरपेक्षा जास्त जागेत आपले काम सुरू केले आहे. रोपलागवडीच्या आपल्या सुरुवातीच्या क्षमतेत वाढ केली असून ती 40 हजारवरून 2 लाखांपेक्षा जास्त केली आहे.

Pune South Command  tree Plantation

“ व्हिजन 75 स्टार” अंतर्गत विविध पर्यावरण संवर्धन उपक्रम

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने ‘आजादी का अमृत महोत्सव’ सोहळ्याचा एक भाग म्हणून दक्षिण कामांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जेएस नैन यांनी “ व्हिजन 75 स्टार” अंतर्गत विविध पर्यावरण संवर्धन उपक्रम सुरू केले आहेत. अशा प्रकारचे पर्यावरण संरक्षण उपक्रम सध्याच्या काळात अतिशय गरजेचे बनले आहेत.त त्याचबरोबर पर्यावरण रक्षण आणि संवर्धनामध्ये प्रत्येक नागरिकाने सकारात्मक योगदान देणे आणि आपल्या भावी पिढ्यांच्या सुरक्षित आणि चांगल्या भविष्यासाठी प्रयत्नशील राहणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे नैन यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सांगितले.

संबंधित बातम्या :

निसर्गप्रेमी अभिनेते सयाजी शिंदेंचा नवा उपक्रम, मुंबईत दुर्मिळ प्रजातीचे वृक्ष, वेलींचं संगोपन आणि संवर्धन होणार

ग्लॅमरस नेहा पेंडसेला आवडतं ‘सस्टेनेबल’ राहणीमान! जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधत चाहत्यांनाही आवाहन

Day Planting of 1.5 lakh saplings by Southern Command in Pune

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI