कुपोषित बालकांच्या शोधासाठी पुणे जिल्हा परिषदेची विशेष शोध मोहीम ; 253 मुले कुपोषित आढळली

कुपोषित बालकांच्या शोधासाठी पुणे जिल्हा परिषदेची विशेष शोध मोहीम ; 253 मुले कुपोषित आढळली
malnourished child

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून कुपोषित बालकांच्या शोधासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे. मोहिमेत आढळून आलेली बालक ही जन्मापासून कुपोषित असल्याचे दिसून आले आहे. गर्भवती असताना बाळ व आईला योग्य पोषण आहार न मिळाल्याने ही मुले कुपोषित राहिली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Dec 11, 2021 | 3:57 PM

पुणे- पुणे जिल्हा महिला व बालकल्याण समितीतर्फे कुपोषित मुलांसाठी शोधासाठी सर्वेक्षण मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेत तब्बल 253 कुपोषित मुले आढळून आली आहेत. तर 1 हजार 603  बालके मध्यम कुपोषित आढळली आहे. कुपोषित बालकांना सर्वसाधारण गटात आणण्यासाठीअंगणवाडी सेविकांच्या मार्फत प्रयत्न केले जात आहेत.

कुपोष मुक्तीसाठी मोहीम

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून कुपोषित बालकांच्या शोधासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे. मोहिमेत आढळून आलेली बालक ही जन्मापासून कुपोषित असल्याचे दिसून आले आहे. गर्भवती असताना बाळ व आईला योग्य पोषण आहार न मिळाल्याने ही मुले कुपोषित राहिली. ऑगस्टमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जिल्ह्यात आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात आली.

कुपोषित मुलांवर ठेवणार लक्ष

जिल्हा परिषदेच्या शोध मोहिमेत आढळून आलेल्या कुपोषित मुलांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. स्थानिक ग्रामपंचायतींनाही यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. या मुलांना नियमितपणे अंगणवाडी सेविका पोषक आहार घरी जाऊन देणार आहेत. या संबंधाची माहिती गोळा केली जात आहे. कुपोषित मुलांना कश्या पद्धतीने आहार दिला पाहिजे याची माहिती मुलांच्या आईवडिलांनी दिली जात आहे. बालकांवर विषेसह लक्ष दिल्यानंतर ही बालके सर्वसाधारण गटात येतील, अशी आशा असल्याचे मत महिला बालकल्याण अधिकारी गिरासे यांनी व्यक्त केले आहे.

VIDEO: 25 वर्षापूर्वी शरद पवार संघ, गोळवलकर गुरुजी आणि सावरकरांबद्दल काय म्हणाले?; पवारांच भाषण जसंच्या तसं

Nagpur | धोकादायक ! पतंग पकडण्याचा नाद जीवावर बेतला, छतावर चढला नि खाली पडला

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 11 December 2021

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें