महाराष्ट्रात पुतण्या गँग सक्रीय, बीडच्या नगराध्यक्षांची जहरी टीका, एका वाक्यात किती जणांवर निशाणा?

महाराष्ट्रात पुतण्या गँग सक्रीय झाली आहे, अशी जहरी टीका बीडचे काका नगराध्यक्ष डॉ. भारत भूषण क्षीरसागर यांनी केली आहे. पुतण्या गँग या एकचा शब्दात त्यांनी अनेकांवर टीका केली.

महाराष्ट्रात पुतण्या गँग सक्रीय, बीडच्या नगराध्यक्षांची जहरी टीका, एका वाक्यात किती जणांवर निशाणा?
काका भारतभूषण क्षीरसागर, पुतणे संदीप क्षीरसागर
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 7:15 PM

बीडः महाराष्ट्रात पुतण्या गँग सक्रीय झाली आहे, अशी जहरी टीका बीडचे काका नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर (Bharatbhushab Kshirsagar) यांनी केली आहे. पुतण्या गँग या एकचा शब्दात त्यांनी अनेकांवर टीका केली. बीडमधील काका डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि पुतणे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्यातील वाद जुना आहे. मात्र यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील पुतण्या त्यांनी टीका आहे. परळीत, बारामतीत आणि बीडमध्ये पुतण्या गँग आहेत, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

‘संदीप क्षीरसागर यांनी पदासाठी रक्ताचे नाते तोडले’

पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांनी पदासाठी रक्ताचे नाते तोडले, ही परंपरा आमची नाही अशी खंत व्यक्त करत महाराष्ट्रात पुतण्या गँग सक्रिय झाली आहे. अशी जहरी टीका काका नगराध्यक्ष डॉ. भारत भूषण क्षीरसागर यांनी केली आहे. शहराच्या विकास कामात खोडा घालण्याचे काम कोणी केला असा सवाल उपस्थित करत राजकीय स्पर्धा असावी, मात्र ती विकासात खोडा घालणारी नसावी. मी 88 कोटी आणले तर तुम्ही 100 कोटी आणा… असा थेट घणाघात आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर केला आहे.

विकासकामावरून काका-पुतण्यात वाद

बीड नगरपालिकेतील विकास कामावरून क्षीरसागर काका पुतण्यात यापूर्वीही अनेकदा जुंपली आहे. शिवसेनेच्या ताब्यातील बीड नगरपालिकेतील विकास कामात जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर खोडा घालत असल्याचा आरोप बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केला आहे. डॉ. भारतभूषण क्षीरसागर म्हणाले, ‘ तुम्ही आमदार व्हा म्हणून माझ्यात विष कालविण्याचे काम केले. 35 वर्ष झाले मी नगराध्यक्ष आहे. माझे वय 60 वर्ष झाले मात्र मी कधीही आमदार व्हायचं म्हणालो नाही. रक्ताचे नाते तोडले, ही परंपरा आमची नाही. महाराष्ट्रात पुतण्या गँग सक्रीय झाली आहे.

इतर बातम्या-

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांविरोधात भाजपचा अविश्वास प्रस्ताव; मुंबई महापालिकेचं राजकारण तापलं

CCTV Video | दोघे आले, एकानं बंदूक ताणली, हवेत गोळीबार करत बँक लुटून पसार! कुठं घडला थरार?

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.