AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपात निघालेल्या काँग्रेसच्या राहुल बोंद्रे यांना थेट राहुल गांधी यांचा फोन, मोठ्या घडामोडी, तुम्ही कुठे जाऊ नका आम्ही..

चिखली विधानसभेचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी काँग्रेस सोडून भाजपात जाणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर थेट राहुल गांधी यांनी त्यांना फोन केला. फक्त फोनच नाही तर भाजपात न जाण्याबद्दल त्यांची मनधरणी केली.

भाजपात निघालेल्या काँग्रेसच्या राहुल बोंद्रे यांना थेट राहुल गांधी यांचा फोन, मोठ्या घडामोडी, तुम्ही कुठे जाऊ नका आम्ही..
Rahul Bondre and Rahul Gandhi
| Updated on: Sep 22, 2026 | 8:38 AM
Share

चिखली विधानसभेचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपण भाजपात जाणार असल्याचे जाहीर केले. ज्यानंतर एकच मोठी खळबळ उडाली. राहुल बोंद्रे यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देणार असल्याचे म्हटल्याने काँग्रेसला थेट झटका बसला. फक्त काँग्रेसच सोडत आहे, हेच नाही तर आपण भाजपात जात असल्याचेही त्यांनी जाहीर केले. यापूर्वी देखील  त्यांनी दोन वेळा सोशल मीडियावर अशाप्रकारचे व्हिडीओ शेअर केले होते. त्यानंतर काँग्रेसच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी केली. यावेळी राहुल बोंद्रे हे त्यांच्या निर्णयावर ठाम होते. चिखली विधानसभेत चांगला संपर्क राहुल बोंद्रे यांचा आहे. राहुल बोंद्रे यांची पक्षाला सोडचिठ्ठी म्हणजे काँग्रेसला मोठा धक्का मानला जात होता.

शेवटी राहुल बोंद्रे यांना भाजपात जाण्यापासून रोखण्यासाठी स्वत: राहुल गांधी मैदानात आले. थेट राहुल गांधी यांनीच राहुल बोंद्रे यांना फोन केला आणि पक्षातच राहण्याबद्दल भाष्य केले. लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी थेट राहुल बोंद्र यांना फोन केला. नुसता फोनच नाही तर त्यांनी म्हटले की, तुम्ही चांगले काम करत आहात. तुम्ही पक्षासोबत प्रामाणिक आहेत.

तुमची पक्षाला गरज आहे. तुम्ही घेतलेल्या निर्णयावर पुन्हा विचार करा. थेट राहुल गांधी हेच राहुल बोंद्रे यांची मनधरणी करताना दिसले. राहुल बोंद्र हे राहुल गांधी यांच्या फोननंतर भाराहून गेले. त्यांनी म्हटले की, तुम्ही मला फोन केला, माझी दखल घेतली. मी आता काँग्रेससाठीच काम करणार आहे. माझ्याकडे काहीही राहिले नाही तरीही मी काँग्रेसचे काम करेल.

माजी आमदाराला काँग्रेसमधून जाण्यापासून रोखण्यासाठी थेट राहुल गांधीच मैदानात उतरल्याने जोरदार चर्चा रंगताना दिसत आहेत. काँग्रेसमधून अनेक मोठे नेते सोडून जाताना दिसत आहेत. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात राहुल गांधी आक्रमक भूमिका घेताना दिसले. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर जाऊन जोरदार आंदोलन केले. यावेळी प्रियंका गांधीही उपस्थित होत्या.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...