रायगडमध्ये 556 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांचा आकडा हजाराच्या पार

रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (29 मे) दिवसभरात 52 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Raigad Corona Update). तर चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

रायगडमध्ये 556 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांचा आकडा हजाराच्या पार

रायगड : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (29 मे) दिवसभरात 52 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Raigad Corona Update). तर चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 हजार 8 वर पोहोचली आहे. यापैकी 556 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात काल (29 मे) दिवसभरात 25, पनवेल ग्रामीण क्षेत्रात 3, उरणमध्ये 1, खालापूर तालुक्यात 1, कर्जत तालुक्यात 7, पेण तालुक्यात 5, अलिबागमध्ये 2, माणगावात 3, म्हसळ्यात 3 आणि महाडमध्ये 2 अशा एकूण 52 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर पनवेल मनपा क्षेत्रातील 1, पनवेल ग्रामीण 2, उरणमधील 1 अशा 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रायगडकरांसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे, दिवसभरात पनवेल मनपा 9, उरण 1, कर्जत 1, अलिबाग 1, माणगाव 5 अशा एकूण 17 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 556 वर पोहोचली आहे. आरोग्य यंत्रणेची मेहनत आणि रुग्णांची इच्छाशक्ती या जोरावर या रुग्णांनी कोरोनाला हरवले. त्यांना रुग्यालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

सध्या रायगड जिल्ह्यातील 405 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर विविध कोव्हिड रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. यामध्ये पनवेल मनपा 169, पनवेल ग्रामीण 60, उरण 21, खालापूर 6, कर्जत 21, पेण 11, अलिबाग 25, मुरुड 9, माणगाव 32, तळा 6, रोहा 17, सुधागड 1, श्रीवर्धन 4, म्हसळा 8, महाड 1, पोलादपूर तालुक्यातील 12 पॉझिटीव्ह रुग्णांचा समावेश आहे.

कोणत्या क्षेत्रात किती रुग्ण बरे झाले?

पनवेल मनपा-282, पनवेल ग्रामीण 114, उरण-131, खालापूर-2, कर्जत-4, पेण-2, अलिबाग-7, माणगाव-6, तळा-1, श्रीवर्धन-5, महाड-1, पोलादपूर-1, एकूण 556

कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची क्षेत्रानुसार आकडेवारी:

पनवेल मनपा-22, पनवेल ग्रामीण-9, उरण-1, खालापूर-1, कर्जत-2, अलिबाग-2, मुरुड-2, श्रीवर्धन-2, म्हसळा-2, महाड-3, पोलादपूर-1, एकूण मृत्यू – 47

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | ‘गुडन्यूज’, राज्यात सर्वाधिक 8,381 जण कोरोनामुक्त, बाधितांचा आकडा 62 हजारांच्या पार

मोदी 2.0 सरकारची वर्षपूर्ती, पंतप्रधानांचं जनतेला पत्र

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *