AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahad Crime : महाडमध्ये जप्त केलेला मुद्देमाल नष्ट करताना स्फोट, तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

महाड औद्योगिक पोलीस ठाण्यांमध्ये पूर्वी जप्त केलेला विस्फोटक मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळाल्यानंतर कांबळे तर्फे महाड येथील एका दगड खाणीत हा मुद्देमाल नष्ट करत असताना मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये अलिबाग येथून आलेले तीन पोलिस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले आहेत.

Mahad Crime : महाडमध्ये जप्त केलेला मुद्देमाल नष्ट करताना स्फोट, तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
महावितरणचा भोंगळ कारभार दोन भावंडांच्या जीवावर बेतलाImage Credit source: tv9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Mar 09, 2022 | 12:06 AM
Share

महाड : महाड तालुक्यात कांबळे तर्फे महाड गावाजवळ पोलिसांनी जप्त केलेला जुना विस्फोटक मुद्देमाल नष्ट (Destroying) करत असताना झालेल्या स्फोटा (Blast)त दोन पोलिस कर्मचारी गंभीररित्या जखमी (Injured) झाले आहेत. दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांवर महाड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून मुंबई येथे हलवण्यात आले आहे. हा मुद्देमाल कांबळे येथील एका दगड खाणीत नष्ट करताना अपघात झाला. राहुल दोशी, रमेश कुटे, आशीर्वाद लगदे अशी जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर एक पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाला. (Explosion while destroying confiscated items in Mahad, Three policemen were seriously injured)

स्फोटामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये मोठे हादरे

मिळालेल्या माहितीनुसार महाड औद्योगिक पोलीस ठाण्यांमध्ये पूर्वी जप्त केलेला विस्फोटक मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळाल्यानंतर कांबळे तर्फे महाड येथील एका दगड खाणीत हा मुद्देमाल नष्ट करत असताना मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये अलिबाग येथून आलेले तीन पोलिस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे परिसरातील कांबळे तर्फे महाड, आकले, भोराव आदी गावांमध्ये मोठे हादरे बसले. या धक्क्याने गावातील घरे देखील हादरली असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. आवाज होताच गावातील नागरिक घाबरून घराबाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस अधिकारी, प्रांताधिकारी प्रतिमा पुडलवाड, तहसिलदार सुरेश काशीद आदींनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.

पालघरमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात

पालघर माहिम रोडवर कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघात एवढा भयानक होता की कारचा चक्काचूर झाला आहे. गंगाधर देवकाते (42) असे अपघातात ठार झालेल्या कार चालकाचे नाव आहे. सदर कार माहिमहून पालघरच्या दिशेने चालली होती. माहिम रोडवर पानेरीजवळ समोरुन येणाऱ्या ट्रकवर आदळली. अपघाताची नोंद सातपाटी सागरी पोलीस अंतर्गत माहिम पोलीस चौकीत करण्यात आली आहे. मयत कार चालक जालना जिल्हा परिषदेतील शाळेत शिक्षक आहेत. (Explosion while destroying confiscated items in Mahad, Three policemen were seriously injured)

इतर बातम्या

Law and Order : पोलीस स्टेशनमधलं सगळ्यात मोठं पद कोणतं असतं माहीत आहे? चला जाणून घेऊया!

Palghar Accident : पालघरमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात, कार चालकाचा मृत्यू

Follow Us
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?