Palghar Accident : पालघरमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात, कार चालकाचा मृत्यू

मयत शिक्षक देवकाते हे जालन्याहून पालघरमध्ये आपल्या भावाला भेटण्यासाठी कुटुंबासह आले होते. देवकाते यांचा भाऊ पालघर येथे नगर रचना विभागात काम करतो. भावाला भेटण्यासाठी देवकाते एकटेच आपली कार घेऊन माहिम येथे गेले होते. भावाला भेटून पालघरला परतत असतानाच पानेरी जवळ त्यांची कार समोरुन येणाऱ्या ट्रकवर आदळली.

Palghar Accident : पालघरमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात, कार चालकाचा मृत्यू
पालघरमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 12:19 AM

पालघर/ मोहम्मद हुसैन (प्रतिनिधी) : पालघर माहिम रोडवर कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघाता (Accident)त कार चालकाचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघात एवढा भयानक होता की कारचा चक्काचूर झाला आहे. गंगाधर देवकाते (42) असे अपघातात ठार झालेल्या कार चालका (Car Driver)चे नाव आहे. सदर कार माहिमहून पालघरच्या दिशेने चालली होती. माहिम रोडवर पानेरीजवळ समोरुन येणाऱ्या ट्रकवर कार आदळली. अपघाताची नोंद सातपाटी सागरी पोलीस अंतर्गत माहिम पोलीस चौकीत करण्यात आली आहे. मयत कार चालक जालना जिल्हा परिषदेतील शाळेत शिक्षक आहेत. (Car and truck crash in Palghar, car driver killed)

मयत शिक्षक देवकाते हे सोमवारी जालन्याहून पालघरमध्ये आपल्या भावाकडे कुटुंबासह आले होते. देवकाते यांचा भाऊ पालघर येथे नगर रचना विभागात काम करतो. देवकाते एकटेच आपली कार घेऊन माहिमच्या दिशेने पालघरला परतत असतानाच पानेरी जवळ त्यांची कार समोरुन येणाऱ्या ट्रकवर आदळली. स्थानिकांनी तात्काळ त्यांना पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यावेळी देवकाते यांच्या कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला.

नांदेडमध्ये गाडीवरील ताबा सुटल्याने कार डिव्हाईडरला धडकली

नांदेडमध्ये मध्यरात्री एका कार चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या डिव्हाईडरला धडकली. यात कारमधील तिघे जण जखमी झाले आहेत. नांदेड शहरातील विद्यानगर भागात रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.

पुणे-महाड मार्गावरील वरंधा घाटात दुचाकीसह दोघं दरीत

पुणे-महाड मार्गावरील वरंधा घाटात नागमोडी वळणाचा अंदाज न आल्याने, दुचाकी 60 फूट दरीत कोसळून अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात दोघा दुचाकीस्वारांना किरकोळ दुखापत झाली. याशिवाय दुचाकीचेही नुकसान झाले आहे. हे दोघेही तरुण पुण्यातील अप्परमधील राहणारे आहेत. भोईराज जल आपत्ती टीम आणि स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने दुचाकीसह दोघांना दरीतून वर काढण्यात आले. (Car and truck crash in Palghar, car driver killed)

इतर बातम्या

Nashik Crime : नाशिकमधील बोलठाण येथील प्रिन्स ट्रेडर्सवर छापा, 46 लाखांचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

Suicide | महिला दिनाच्या पूर्वसंध्येला संतापजनक घटना! सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.