AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Crime : नाशिकमधील बोलठाण येथील प्रिन्स ट्रेडर्सवर छापा, 46 लाखांचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

अन्न व औषध प्रशासन विभाग, नाशिक व नांदगाव पोलीस यांनी संयुक्तिक कारवाई केली आहे. मध्यरात्री केलेल्या या कारवाईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या गोडावून व एका वाहनातून सुगंधित तंबाखू, गुटखा, पान मसाला आदींच्या भरलेल्या गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत.

Nashik Crime : नाशिकमधील बोलठाण येथील प्रिन्स ट्रेडर्सवर छापा, 46 लाखांचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त
अवैद्यरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्यावर कारवाईImage Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Mar 08, 2022 | 8:04 PM
Share

नाशिक : नाशिकच्या नांदगांव तालुक्यातील बोलठाण येथील प्रिन्स ट्रेडर्स या गोदामावर छापा (Raid) टाकत 46 लाख 26 हजार रुपयांचा गुटखा (Gutkha) हस्तगत करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग, नाशिक व नांदगाव पोलीस यांनी संयुक्तिक कारवाई केली आहे. मध्यरात्री केलेल्या या कारवाईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या गोडावून व एका वाहनातून सुगंधित तंबाखू, गुटखा, पान मसाला आदींच्या भरलेल्या गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईवेळी संशयित गोकुळ कोठारी व जैन यांनी तपासात अडथळा करण्याचा प्रयत्न केला. या दोघा संशयितांवर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेतील दोघेही संशयित फरार झाले आहेत. (Gutka worth Rs 46 lakh seized from Prince Traders at Bolthan in Nashik)

जुन्नरमध्ये अफूच्या शेतीवर छापा

जुन्नरमध्ये ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी छापा टाकून अफूची झाडे जप्त केली आहेत. धोलवड गावातील शेतकरी महादेव विठ्ठल नलावडे (53) यांनी त्यांचे वडील विठ्ठल सखाराम नलावडे यांच्या नावे असलेल्या कांद्याच्या पिकात आंतरपिक म्हणून अफू या अंमली पदार्थाचे झाडांची बेकायदेशीर विनापरवाना व्यापारी/व्यावसायिक हेतूने अफूच्या झाडाची लागवड केली. याची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक कांबळे व त्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन छापा टाकला. या धाडसत्रात अफूची (खसखस) एकूण 13.142 किलोग्रॅम झाडे ज्याची किंमत अंदाजे 85423 रुपये आहे जप्त करण्यात आली आहे. आरोपी महादेव विठ्ठल नलावडे याला ओतूर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरु आहे.

बुलडाण्यात तरुणाला अटक करीत दोन तलवारी जप्त

गुन्हा करण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगून असलेल्या एका तरुणाला शहर पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून दोन तलवारी जप्त केल्या आहेत. बुलडाणा पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने ही कारवाई केली आहे. डीबी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आनंदा कडुबा काकफळे हा तरुण जिल्हा कारागृहामागील परिसरात दोन तलवारी बाळगून गुन्हा करण्याच्या उद्देशाने दडून बसलेला आहे. या माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यांमधून आनंदा काकफळे याला अटक करून त्याच्याकडील पाच हजार रुपये किंमतीच्या दोन तलवारी जप्त केल्या असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Gutka worth Rs 46 lakh seized from Prince Traders at Bolthan in Nashik)

इतर बातम्या

Suicide | महिला दिनाच्या पूर्वसंध्येला संतापजनक घटना! सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

Gaziabad Suicide : गाझियाबादमध्ये आर्थिक विवंचनेतून महिलेची मुलांसह आत्महत्या, वाचा नेमके काय घडले ?

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.