57 प्रवाशांना घेऊन जाणारी बस ताम्हिणी घाटात बस उलटली…; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Travel Bus Accident 2 Death in Tamhini Ghat : काळजाचा थरकाप उडवणारी घटना... 57 जण प्रवास करत असलेली बस ताम्हिणी घाटात बस पलटली आहे. याअपघातामुळे मार्गावरही वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. मात्र आता ही वाहतूक पूर्वपदावर आली आहे. वाचा सविस्तर बातमी...

57 प्रवाशांना घेऊन जाणारी बस ताम्हिणी घाटात बस उलटली...; काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Follow us
| Updated on: Dec 30, 2023 | 10:14 AM

माणगाव, रायगड | 30 डिसेंबर 2023 : ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला आहे. ताम्हिणी घाटात बस पलटली आहे. रायगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठा अपघात झालाय. माणगाव नजीक ट्रॅवल्स बसचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झालाय. तर 55 जण जखमी झाले आहेत. जखमीना मानगाव उपजिल्हा रुग्णालयात हलवलं आहे. पुण्याहून हरिहरेश्वरला पर्यटनाला जात असताना बसला अपघात झाला आहे. पुणे येथील कंपनीची सहल खाजगी बसने हरिहरेश्वरला जात असताना बस उलटली आहे. या अपघातामुळे या मार्गावरही वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. आता ही वाहतूक पूर्वपदावर आहे.

माणगांव पोलीस ठाणे हद्दीत ताह्मिणी घाटात आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. सकाळी 07.30 वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हल बस उलटली. ट्रॅव्हल्स क्रमांक MH 04 FK 6299 ही पुण्यावरून माणगावकडे येत होती. इतक्यात रस्त्याखाली उतरली आणि बस पलटी झाली. या बसचा भीषण अपघात झाला आहे.

पुण्यातील काही स्थानिक लोक सहलीसाठी जात होते. हरिहरेश्वरला शंकराचं दर्शन हे लोक घेणार होते. आज पहाटे ही बस पुण्याहून हरिहरेश्वरला निघाले. या बसमध्ये 57 प्रवासी प्रवास करत होते. पण ताम्हिणी घाटात आल्यानंतर चालकाचा बसवरचा ताबा सुटला अन् ही बस उलटली. यावेळी एकच गोंधळ पाहायला मिळाला. प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिपसरात घबराट पसरली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 55 जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांना माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयायात दाखल करण्यात आलं आहे.या मार्गावरची वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली. आता मात्र वाहतूक सुरळीत चालू आहे.

दरम्यान, परभणातही भीषण अपघात झाला आहे. परभणी जिल्ह्यात अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. परभणी-जिंतूर महामार्गावर धर्मापुरी जवळ एका टेम्पोचा आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. दरम्यान, प्रत्यक्ष दर्शनींनी या मोटारसायकलस्वाराला तातडीने ऑटोमधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केलं. या दुचाकीस्वारावर सध्या उपचार सुरु आहेत.

Non Stop LIVE Update
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.