भाजपमध्ये जायची वेळ आली तर तटकरे सर्वात पहिली उडी मारतील; रोहित पवारांचा हल्लाबोल

सुनील तटकरे आज जरी अजित दादांसोबत असले तरी वेळ आली तर अजित दादांची साथ सोडणारे पहिले नेटे तटकरेच असतील, अशी घणाघाती टीका रोहित पवार यांनी केली.

भाजपमध्ये जायची वेळ आली तर तटकरे सर्वात पहिली उडी मारतील; रोहित पवारांचा हल्लाबोल
रोहित पवार यांची तटकरेंवर स़कून टीका
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 10:59 AM

आज जरी सुनील तटकरे हे अजित पवार यांच्यासोबत दिसत असले तरी जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये जायची वेळ येईल तेव्हा अजित पवारांची साथ सोडणारे पहिले नेते तटकरे हेच असतील अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी हल्ला चढवला. भाजपमध्ये जायची वेळ आल्यावर तटकरे सर्वात पहिली उडी मारतील अशी घणाघाती टीका रोहित पवार यांनी केली. मुरूडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

तटकरेंवर सडकून टीका

यावेळी रोहित पवार यांनी सुनील तटकरेंवर सडकून टीकाक केली. सुरूवातीच्या काळात तटकरे हे बॅरीस्टर अंतुलेंसोबत होते, त्यांनी त्यांची साथ सोडली. नंतर त्यांनी शरद पवार साहेबांची साथ सोडली. शेकापच्या जयंत पाटील यांच्यासोबत ते होते, त्यांनी जयंत पाटील यांचीही साथ सोडली. आता सध्या ते अजित पवार यांच्यासोबत आहेत. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा अजित पवार यांची साथ सोडणारे तटकरे हे पहिली व्यक्ती असतील अशा शब्दांत रोहित पवार यांनी तटकरेंवर हल्ला चढवला. स्वहितासाठी ते इकडून तिकडे उड्या मारणार असतील तर विचार करण्याची, निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असेही रोहित पवार म्हणाले.

तटकरे निवडणुकीत पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष – जयंत पाटील

सुनील तटकरे निवडणुकीत पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे अशी टीका शेकापचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. त्यांच्याबरोबर फिरणारे लोक आहेत, तेही आम्हाला सांगतात यांना पाडा म्हणून.. असं ते म्हणाले. गेल्या निवडणूकीत आम्ही तटकरेंना मदत केली पण आता ती चूक सुधारायची आहे. तटकरेंचा पराभव करून बदला घ्यायचा असल्याचही त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.