AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यामुळे सुनेत्रा पवार सावध… सुनील तटकरेंचे नाव घेत महेंद्र दळवींनी टाकला बॉम्ब… त्यांचा दावा काय?

Mahendra Dalvi Bombshell on Sunil Tatkare: अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी निशाणा साधला. त्यांनी राष्ट्रवादीतील घडामोडींवर यावेळी कटाक्ष टाकला. काय केला दळवी यांनी दावा?

त्यामुळे सुनेत्रा पवार सावध... सुनील तटकरेंचे नाव घेत महेंद्र दळवींनी टाकला बॉम्ब... त्यांचा दावा काय?
महेंद्र दळवी, सुनील तटकरे, सुनेत्रा पवारImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jul 02, 2026 | 1:01 PM
Share

Mahendra Dalvi Bombshell on Sunil Tatkare: कोकणातील राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील धुसफूस कमी झालेली नाही. पालकमंत्री पदाचा वाद मिटल्यावर तरी नेते एकमेकांवर टीका करणे थांबवतील असे वाटत होते. पण तसे झाले नाही. शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला. एनसीपीतील घडामोडींवर कटाक्ष टाकत त्यांनी मोठा दावा केला आहे. काय म्हणाले दळवी?

भरतशेठ गोगावले पालकमंत्री

पालकमंत्री पद आम्हाला मिळणार आणि भरतशेठ हे पालकमंत्री होतील. आम्ही या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे त्यांनी अधिवेशन संपल्यानंतर यासंदर्भातील घोषणा होणार असा सांगितलं आहे. माझ्या मुलीने देखील विधानपरिषदेच्या उमेदवारीचा अर्ज भरला होता पण शिंदेच्या सूचनेने आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. पण आम्ही निवडनुक लढलो असतो तर अन्ही जिंकलो असतो आणि अनिकेत तटकरे हे निवडणूक हरले असते, असा निशाणा महेंद्र दळवी यांनी तटकरे यांच्यावर साधला.

सुनेत्रा पवार सावध

अजितदादांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीत बड्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीच्या गोटातून धक्कादायक दावे समोर आले. दिल्ली, निवडणूक आयोगापर्यंतच्या पत्रव्यवहाराच्या चर्चा रंगल्या. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदाचा उल्लेख यादीतून गायब झाला. त्यानंतर गेल्या एक महिन्यापासून पक्षातील वादळ बऱ्यापैकी शमल्याचे दिसत असतानाच कोकणातून पुन्हा तटकरेंविरोधात तोफ धडाडली. सुनील तटकरे यांचा स्वभाव हा सगळ्यांना माहित आहे त्यामुळे सुनेत्रा पवार या देखील सावध भूमिका घेत आहेत, असे वक्तव्य महेंद्र दळवी यांनी केले. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटतील. पण या निमित्ताने शिंदे सेना आणि तटकरे गटात पुन्हा वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे.

ऑपरेशन तुतारीची माहिती नाही

ऑपरेशन तुतारी अशी कोणतीही माहिती नाही. मला त्याची कल्पना नाही. आम्ही सर्व खासदार एकत्र राहून शरद पवार यांच्यासोबत राहणार हे आमचे एकमत आहे. निधी मिळत नाही हा विषय आहे पण सरकारकडेच पैसे नाही, अशी प्रतिक्रिया दिंडोरीचे शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार भास्कर भगरे यांनी दिली आहे.

पवार सांगतील ते धोरण

माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला. पुणे नाशिक रेल्वेच्या प्रश्नावर मी उत्तर दिले होते. मी शरद पवारांसोबतच कायम राहणार अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी दिली. पुणे-नाशिक रेल्वे होण्यासाठी राजाभाऊ वाजे आणि अमोल कोल्हे भाजप सोबत गेले तर होऊ शकतो त्यावर माझं उत्तर होतं. सुप्रिया सुळे ह्या आमच्या गटनेत्या आहे आमचे सर्व खासदार एकत्र आहे, ह्या चर्चा काय सुरू आहे त्याची मला कल्पना नाही. संजय राऊत यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याचे मी आभार मानतो. मी कुठ ही जाणार नाही यावर मी मत व्यक्त केले आहे. शरद पवार हे सांगतील ते धोरण बांधतील ते तोरण असल्याचा दावा त्यांनी केला.

Follow Us
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया