AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Oxygen Express | कोरोनाविरोधात लढ्यासाठी आता ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’; देशभरातून राज्यात रेल्वेने ऑक्सिजनचा पुरवठा

ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्यामुळे देशातील वेगवेगळ्या ठिकाणाहून राज्यात ऑक्सीजन मागवण्यात आला आहे. (railway ministry oxygen express corona patients)

Oxygen Express | कोरोनाविरोधात लढ्यासाठी आता 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'; देशभरातून राज्यात रेल्वेने ऑक्सिजनचा पुरवठा
oxygen express
| Updated on: Apr 18, 2021 | 9:28 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे नव्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत आहे. हजारोंनी रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडतो आहे. वेगवेगळी औषधं, रेमडेसिव्हीर इंजेक्शन याबरोबरच ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा राज्यात भासत आहे. या पार्श्वभूमीवर एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्यामुळे देशातील वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन मागवण्यात आला आहे. त्यासाठी विशेष ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ (Oxygen Express) धावणार असून यामधून राज्यासाठी ऑक्सिजन आणला जाणार आहे. (Railway Ministry allows transport of Oxygen through train Maharashtra will bring Oxygen by special Oxygen Express for treatment of Corona patients)

महाराष्ट्रासाठी रेल्वेने ऑक्सिजनचा पुरवठा

याविषयी विचारले असता एका रेल्वे अधिकाऱ्याने सविस्तर माहिती दिली आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारने लिक्वीड ऑक्सिजनसाठी रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधला होता. या दोन्ही राज्यांनी रेल्वेच्या माध्यमातून ऑक्सिजनच्या वाहतुकीबद्दल विचारणा केली होती. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने सोमवारपासून (19 एप्रिल) महाराष्ट्रातून ऑक्सिजनचे खुले टँकर्स रेल्वेमार्गाने विजाग, जमशेदपूर, राऊरकेला, बोकारो येथे पोहोचतील. त्यानंतर येथून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेमार्गाने केला जाईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, देशात मागील काही दिवसांपासून रेमडेसिव्हीर, व्हेंटिलेटर तसेस ऑक्सिजनचा तुटवडा भासत असून अनेक ठिकाणी रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे. आरोग्य सुविधा अपुरी पडत असल्यामुळे मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली तसेच महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर होत चालली आहे. देशात शनिवारी (17 एप्रिल) तब्बल 1501 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर दिवसभरात 2 लाख 61 हजार कोरोना रुग्णांची नोंद केली गेली.

इतर बातम्या :

Corona Cases and Lockdown News LIVE : पुण्यात दिवसभरात 6443 नवे कोरोनाग्रस्त, आतापर्यंत 6109 जणांचा मृत्यू

संतापजनक! चंद्रपुरात कोरोना रुग्णाला बेड मिळाला नाही, बस स्टॉपवर आयुष्याची अखेर

Video | रुग्णवाहिका रस्त्यात फसली, मध्ये रुग्ण अत्यवस्थ; नंतर जे घडलं त्याला पाहून तुम्हीसुद्धा सलाम ठोकाल

(Railway Ministry allows transport of Oxygen through train Maharashtra will bring Oxygen by special Oxygen Express for treatment of Corona patients)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.