AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणानंतर तापमानात घसरण

महाराष्ट्रातील अनेक भागांत सोमवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, गारपिटीसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे.

राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणानंतर तापमानात घसरण
महाराष्ट्रातील अवकाळी पाऊस
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 13, 2025 | 8:47 AM
Share

महाराष्ट्रातील अनेक भागांत सोमवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मंगळवारीसुद्धा वातावरणात बदल झाला असून ढगाळ वातावरणामुळे तापमान घसरले आहे. दरम्यान, मंगळवारी १३ मे रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, गारपिटीसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे.

पुणे परिसरात अनेक ठिकाणी पाऊस झाला. उंड्री वडाचीवाडी परिसरात सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाला. नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसला. नाशिकमध्ये २१ मिमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने नाशिकला ‘यलो अलर्ट’ दिला होता. मात्र, दुपारनंतर परिस्थितीत बदल झाला असून तो ‘ऑरेंज अलर्ट’ करण्यात आला.

परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे केळी पिके आडवी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसल्याचे दिसून येते. उन्हाळी पिके, भुईमूग, हळद आणि आंब्याचे पावसामुळे नुकसान झाले आहे. दोन-तीन दिवसांच्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले आहे.

वाशीमसह जिल्ह्यात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला आहे. वाशिम जिल्ह्यातील ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे तापमानाचा पारा कमी झाला आहे. वाशिम जिल्ह्याला पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. सर्दी, खोकला, अंगदुखीचा त्रास नागरिकांना होत आहे.

यवतमाळ जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. आर्णी तालुक्यात अवकाळी पावसाने जोर धरला आहे. मंगळवारी आर्णी तालुक्यासह अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे भुईमूग पिकाला काही प्रमाणात फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वीज पडून मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तहसील अंतर्गत येत असलेल्या चोरपांग्रा येथील 35 वर्षीय महिला रंजना चव्हाण यांचे अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतक रंजना चव्हाण या त्यांच्या चोरपांग्रा शिवारातील शेतात कुटुंबासह कापूस वेचणीसाठी जात होत्या.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...