AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray: रस्ते बनवणं हा आपल्याकडे धंदा, ते खराब झालेच पाहिजेत; राज ठाकरेंचे वक्तव्य चर्चेत

Raj Thackeray: राज्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसांमुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. नुकतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर वक्तव्य केले आहे. 'रस्ते बनवणं हा आपल्याकडे धंदा, ते खराब झालेच पाहिजेत' त्यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Raj Thackeray: रस्ते बनवणं हा आपल्याकडे धंदा, ते खराब झालेच पाहिजेत; राज ठाकरेंचे वक्तव्य चर्चेत
Raj ThackerayImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 21, 2025 | 12:14 PM
Share

गेल्या काही वर्षांपासून राज्यातील खराब रस्ते हा विषय चर्चेचा ठरत आहे. तसेच मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणच्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याविषय वक्तव्य केले आहे. ‘रस्ते बनवणं हा आपल्याकडे धंदा आहे, ते खराब झालेच पाहिजेत’ असे त्यांनी म्हटले आहे. त्यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

‘रस्ते बनवणे हा धंदा आहे’

‘रस्ते बनवणे हा धंदा आहे. ते खराब झालेच पाहिजे. सर्व साटंलोटं आहे. रस्ते खराब झाले की टेंडर निघतं. खड्डे बुजवण्याचं टेंडर निघतं. कंत्राटदाराला शिक्षा होत नाही. अनेक वर्षापासून हे सुरू आहे. लोक खड्ड्यात पडून मरत आहेत. तरीही लोक ज्यांच्यामुळे घडतंय त्यांनाच मतदान करत आहेत. त्यामुळे लोक आपल्याला मतदान करत असल्याने तेही काही करत नाहीत’ असे राज ठाकरे म्हणाले.

वाचा: हिंदुस्तान जिंदाबाद… तिरंग्यासाठी लंडनमध्ये भारतातील मुस्लिम मुली पाकिस्तान्यांशी भिडल्या, अंगावर शहारे आणणार Video

‘त्यांचं राज्य खड्ड्यात गेलं ते दिसत नाही’

पुढे राज ठाकरे म्हणाले, ‘आम्ही जे करतोय ते बरोबर करतोय असं त्यांना वाटतं. हा फक्त मुंबईचा विषय नाही. सर्व राज्यांचा विषय आहे. बाहेरच्या राज्यातून लोक येतात त्यांना महाराष्ट्रातील खड्डे दिसतात. पण त्यांचं राज्य खड्ड्यात गेलं ते दिसत नाही. ट्रॅफिकचा लोड सर्व शहरांवर येतो. फक्त मुंबई पुण्यावर नाही.’

गाड्यांचे दर पाहिले तर पार्किंचा दर परवडायला हरकत नसेल. महिन्याला दोन तीन हजार असेल तरी तुमची गाडी सेफ राहते. रस्त्यावर त्रास देत नाही. सर्वच गोष्टी फुकट नाही मिळत ना. समजा दादरला ८० ते ९० हजार स्क्वेअर फुटाचा भाव चालू आहे. रस्त्यावर तुमची गाडी किती स्क्वेअर फूट घेते. त्याचा भाव लावायचा का. असं होत नाही ना. त्यामुळे काही दर आकारला पाहिजे. नाही तर ट्रॅफिकची समस्या वाढेल. कशाचा पायपोस कशात नाही. ट्रॅफिकचा एकदाचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे ना. रोज या शहरात माणसं आदळत आहेत. रस्ते मोठे होत नाही. इमारती उंच होत आहे. सी लिंकला पार्किंगचा लॉट केला होता. काही प्रेशरने काढायला लावला. आमच्यासमोर पार्किंग नको असं धनदांडग्यांनी सांगितलं. तुमच्यासमोर पार्किंग नको म्हणजे काय? माणसं येणारी थांबवली पाहिजे. बाहेरची राज्य डेव्हल्प केली पाहिजे. पण त्यातल्या त्यात हे हातात आहे ते करायला पाहिजे असे देखील राज ठाकरे म्हणाले.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.