‘राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर..,’ काय म्हणाले राज ठाकरे ?
मीरारोड येथे मराठी आणि हिंदी वादानंतर मनसे प्रमुख यांची शुक्रवारी रात्री मोठी जाहीर सभा झाली. या सभेपूर्वी राज ठाकरे यांचे जेसीबीतून फुलांचा वर्षाव करीत जोरदार स्वागत केले गेले.

मीरारोड भाईंदरला हिंदी व्यापाऱ्याला मारहाण झाल्यानंतर त्यांनी मोर्चा काढल्यानंतर मनसेनेही मोर्चा काढल्यानंतर आज प्रथमच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मीरारोडला जाहीर सभा घेतली.राज ठाकरे म्हणाले की राज्यात पहिली ते पाचवी हिंदी सक्तीच्या करण्यावरुन हा वादाची सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले राज्यात त्रिभाषासूत्र लागू करणारच याबद्दल राज ठाकरे यांनी राज्य सरकारला जोरदार इशारा दिला म्हणाले की राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्याला आमचा इलाज नाही अशा इशाराच दिला.
राज ठाकरे पुढे म्हणाले की येथे राहा आणि मराठी शिका, आम्हाला तुमच्याशी काहीही वावडं नाही. भांडण नाहीए.. पण मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार असा इशारा ठाकरे यांनी दिला. खरं तर काय विषय होता. पहिली ते पाचवी राज्य सरकारने म्हणे हिंदी कंपल्सरी. म्हणे हिंदी भाषा शिकली पाहिजे. त्यावरून हे सर्व सुरू झालं आहे.
आत्महत्या करायची असेल तर बेशक करावी
काल आमचे मुख्यमंत्री फडणवीस, त्यांनी काल सांगितलं म्हणे, तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार. आता राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर बेशक करावी असा गर्भित इशारा राज ठाकरे यांनी दिला. त्या दिवशीच्या मोर्चाच्या धसक्याने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यायला लागला होता. फडणवीस जी,तुम्ही म्हणताय तिसरी भाषा सक्तीची आणणार म्हणजे आणणार. तुम्ही पहिली ते पाचवी हिंदी आणण्याचा प्रयत्न तरी करून पाहाच. दुकानं नाही, शाळा देखील बंद करेन असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
