अजितदादांची तब्येत उत्तम, सध्या त्यांना कुठलाही त्रास नाही, कार्यकर्त्यांनी चिंता करु नये : राजेश टोपे

अजितदादांची तब्येत अत्यंत चांगली असून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितलं आहे.

अजितदादांची तब्येत उत्तम, सध्या त्यांना कुठलाही त्रास नाही, कार्यकर्त्यांनी चिंता करु नये : राजेश टोपे

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांना ब्रीड कँन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.  रुटीन चेकअपसाठी अजित पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर अजित पवारांच्या तब्येतीविषयी कार्यकर्ते चिंता व्यक्त करु लागले आहेत. मात्र अजितदादांची तब्येत अत्यंत चांगली असून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितलं आहे. (Rajesh Tope Comment On Ajit pawar health)

राज्यभरातल्या कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांच्या तब्येतीविषयी विचारपूस करणारे फोन, मेसेज सुरु झाले आहेत. पण मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी अजिबात काळजी करु नये. दादांची तब्येत अतिशय व्यवस्थित आहे. त्यांना सध्या कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी कोरोना चाचणी केली होती. सुदैवाने ती निगेटिव्ह आली होती. मात्र अजित पवारांना कणकण आणि ताप असल्याने ते घरीच थांबून विश्रांती घेत होते. आता पुन्हा एकदा अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.

माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गेल्या काही दिवसांपासून कणकण आणि थोडासा ताप जाणवत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वैद्यकीय चाचणी केली होती. पहिल्यांदा त्यांची कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. परंतु तो पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आला आहे. (Rajesh Tope Comment On Ajit pawar health)

संबंधित बातम्या

Ajit Pawar Corona : मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *