Rajyasabha Election : मला राजकारणात कुणी अस्पृश्य नाही, हितेंद्र ठाकूर यांचं वक्तव्य, राज्यसभेबाबत मतदानादिवशीच भूमिका मांडणार

आजचा मित्र उद्याचा विरोधकही असू शकतो. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या सांगण्यावरून मी भाजपच्या धनंजय मुंडे यांना मतदान केले होते. महाविकास आघाडी आणि भाजपचे टॉप लिडर्सनी मला संपर्क साधलाय, असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटातलं टेन्शन सध्या वाढलं आहे.

Rajyasabha Election : मला राजकारणात कुणी अस्पृश्य नाही, हितेंद्र ठाकूर यांचं वक्तव्य, राज्यसभेबाबत मतदानादिवशीच भूमिका मांडणार
महाविकास आघाडीत खूश नाही, हितेंद्र ठाकूर यांचं वक्तव्य, राज्यसभेबाबत मतदानादिवशीच भूमिका मांडणारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 5:19 PM

मुंबई : राज्यसभेसाठी (Rajyasabha Election) जसजसे मतदानाचे दिवस जवळ येत आहेत, तसतशी रंगत वाढताना दिसत आहे. कारण आता बहुजन विकास आघाडीचे (Bahujan Vikas Aghadi) नेते आणि आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी या निवडणुकीबाबत एक मोठं विधान केलं आहे. मी महाविकास आघाडीत 100 टक्के खूष नाही, असे हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत. तसेच मी सरकारला पाठिंबा दिलाय म्हणून ते वसई विरार महापालिका माझ्यासाठी सोडणार आहेत का ? असा सवालही त्यांनी केला आहे. मतदानाला अजून आठवडा आहे, खूप उलथापालथ होईल.मला कोणताही राजकीय पक्ष अस्पृश्य नाही. आजचा मित्र उद्याचा विरोधकही असू शकतो. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या सांगण्यावरून मी भाजपच्या धनंजय मुंडे यांना मतदान केले होते. महाविकास आघाडी आणि भाजपचे टॉप लिडर्सनी मला संपर्क साधलाय, असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटातलं टेन्शन सध्या वाढलं आहे.

कुणाची ताकद काय ती कळेल

महाविकास आघाडीकडून अपक्ष आणि मित्रपक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे, तर दुसरीकडे भाजपने सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक यांना उमदवारी देत महाविकास आघाडीला तगडं आव्हान दिलंय. अशात महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मात्र त्याचवेळी हिंतेंद्र ठाकूर यांनी सावध भूमिका घेतल्याने आता महाविकास आघाडीच्या गोटात राजकीय खळबळ माजली आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचे 3 आमदार आहेत. याबाबत बोलताना ठाकूर म्हणाले, एका विशिष्ट परिस्थितीमुळे ही निवडणूक निर्माण झाली आहे. त्यासाठी कोणता एक राजकीय पक्ष जबाबदार नाही. प्रत्येक राजकीय पक्ष आपली ताकद आजमावणार, ताकद दाखवणार. निवडणूक होणं गैर नाही. आता कळेल कुणाची काय ताकद आहे ते, असे सूचक विधान ठाकूर यांनी केलं आहे.

सर्व नेते माझ्या संपर्कात

निवडणूक टाळता येऊ शकते, पण कुणी धरायचे कुणी सोडायचे हा प्रश्न असतो. राजकारणात एक इगो किंवा ईर्षा असते. इगोपोटी निवडणुका आल्याहेत. पण त्यात चुकीचे काय कळेल ना ताकद काय आहे ? लोकसभा, विधानसभा बिनविरोध होऊ शकते का ? माझ्या मर्जीचे ते बिनविरोध असे होऊ शकत नाही. प्रत्येकला लोकशाहीत मत मागण्याचा, निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. माझा महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा आहे. प्रत्येक राजकीय पक्ष संपर्क साधत आहेत. त्यात काही चुकीचे नाही. सर्व राजकीय पक्षाच्या टॉप लिडर्सनी संपर्क साधला, काही भेटले. काही भेटत आहेत बोलत आहेत, असेही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मी माणूस बघून मत दिलं

प्रत्येक निवडणूक संपर्क हा प्रचार असतो. जो आमच्या विभागाच्या कामांना प्राधान्य देतो आम्ही त्यांच्या बरोबर असतो. मग आजी – माजी मुख्यमंत्री का असेनात. महाविकास आघाडीला विशिष्ट कारणांनी पाठिंबा आहे. दोन अडीच वर्षे ज्या पद्धतीने वागणूक दिली. कुणी आपल्या शासनाच्या विरोधात का जातो तर आपल्या विभागात मूलभूत सोयी सुविधांची कामे किती झाली ह्याचे इव्हलयुएशन करून निर्णय घेतला जातो. मी विधानसभेत स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंना बोललो होतो की मी धनंजय मुंडेंना मत दिले. आजपर्यंत आम्ही काँग्रेस, NCP शिवसेना तिसरी आघाडी लोकं बघून मत देत आलोय. वैयक्तिक संबंध आणि शासन आपल्या विभागासाठी काय करते ते पाहिले, असे आता ठाकूर म्हणाल्याने महाविकास आघाडी त्यांची नाराजी कशी दूर करणार, हेही पाहणं तितकेच महत्वाचे ठरणार आहे. तसेच मी व्हीप काढल्या नंतर माझ्या पक्षाचे आमदार मला दाखवून मत देतील. हा घोड्याचा बाजार नेमका भरतो कुठे ? घोडेबाजार का म्हणता ? आमदार बाजार म्हणा ना थेट, असे आव्हानही त्यांनी दिलं आहे.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.