Rajyasabha Election : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार? संजय पवार यांचं मोठं विधान, भाजपने मात्र सस्पेन्स कायम ठेवला

भाजपने दोनच उमेदवार दिले आहे. तिसऱ्या उमेदवाराचा सस्पेन्स भाजपने कायम ठेवला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. असे विधान संजय पवार यांनी केलं आहे. आता संजय पवारांचं हे विधान किती खरं ठरतं? हेही चित्र लवकरच स्पष्ट होईल. 

Rajyasabha Election : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार? संजय पवार यांचं मोठं विधान, भाजपने मात्र सस्पेन्स कायम ठेवला
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 8:49 PM

मुंबई : राज्यात सध्या चर्चा आहे ती फक्त आणि फक्त राज्यसभा निवडणुकीची (Rajyasabha Election) या सहा जागांच्या निवडणुकीने राज्यतलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या सहा जागांसाठी काँग्रेस (Congress) वगळता सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहे. शिवसेनेकडून (Shivsena) दोन जणांना उमेदवारी देण्यात आलीय. तर भाजपकडून दोन जणांना उमेदवारी देण्यात आलीय. दुसरीकडे राष्ट्रवादीनेही आपला एक उमेदवार दिला आहे. त्यात आता शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे. भाजपने दोनच उमेदवार दिले आहे. तिसऱ्या उमेदवाराचा सस्पेन्स भाजपने कायम ठेवला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. असे विधान संजय पवार यांनी केलं आहे. आता संजय पवारांचं हे विधान किती खरं ठरतं? हेही चित्र लवकरच स्पष्ट होईल.

राज्यसभेसाठी आतपर्यंत फायनल झालेले उमेदवार

  1. राज्यसभेसाठी सर्वात आधी शिवसेनेकडून संजय राऊत आणि नंतर संजय पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे संभाजीराजे यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. यावरून बराच राजकीय वादही रंगला.
  2. दुसरीकडे शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीनेही संभाजीराजे यांना आधी पाठिंबा देऊ म्हणत पुन्हा आमची मतं शिवसेनेलाच असा पवित्रा घेतला. तसेच राष्ट्रवादीकडून एका जागेसाठी प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यात आली.
  3. आज भाजपने आपले उमेदावर कोण असतील हे स्पष्ट करत पियुष गोयल आणि अनिल बोंडे ही दोन नावं जाहीर करून टाकली आहेत. मात्र तिसरा उमेदवार भाजपने न दिल्याने संजय पवार यांनी ही विधान केलं आहे. मात्र भाजपच्या गोटातला ससपेन्स सहाव्या जागेसाठीचा अद्याप कायम आहे.
  4. काँग्रेसनेही आपल्या उमेदवाराचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. कारण काँग्रेसने अद्यापही कुणाचे नाव जाहीर केले नाही. त्यामुळे काँग्रेस कुणाला उमेदवारी देतं? हेही चित्र लवकरच स्पष्ट होईल.
  5. हे सुद्धा वाचा

भाजप तिसरा उमेदवार देणार की नाही?

भाजपने आज दोनच नावं जाहीर केली आहेत. संभाजीराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पक्षाने परवानगी दिल्यास आम्ही तिसरा उमेदवार देऊ असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. चंद्रकांत पाटलांच्या सुरात सूर मिळवत फडणवीसही याच भूमिकेत दिसून आले होते. मात्र अजूनही भाजपने उमेदवार दिला नाही, तसेच उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने उद्यापर्यंत भाजपने उमेदवार दिला नाही. तर ही निवडणूक बिनविरोधच होणार आहे. त्यामुळे संजय पवार यांचं विधान खरं ठरण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.