AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut on Ram Mandir : प्रभू श्रीरामांच्या आभूषणांवरही डल्ला , मंदिर ट्र्स्ट बरखास्त करा, ट्रस्टवर गुन्हा दाखल करा; संजय राऊत कडाडले

अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील पैशांच्या अपहार प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. आठ जणांना अटक करून एसआयटी गठीत झाली आहे. संजय राऊत यांनी याला 'दरोडा' संबोधत सरकार व भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गट रामरक्षा आंदोलन करणार असून, राऊतांनी संघाने भाजपऐवजी रामभक्तांच्या बाजूने उभे राहावे असे आवाहन केले.

Sanjay Raut on Ram Mandir : प्रभू श्रीरामांच्या आभूषणांवरही डल्ला , मंदिर ट्र्स्ट बरखास्त करा, ट्रस्टवर गुन्हा दाखल करा; संजय राऊत कडाडले
संजय राऊत यांचे गंभीर आरोप
| Updated on: Jul 04, 2026 | 12:37 PM
Share

हजारो -लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीत हात घालत पैशांचा अपहार करण्यात आल्याचा आरोप असून यामुळे देशभरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी 8 जणांना अटक झाली असून एसआयटी गठीत करण्यात आली आहे. दानाच्या पैशांच्या अपहार झाल्याचं हे प्रकरण चांगलंच तापलं असून एकीकडे शिवसेना ठाकरे गटाने रामरक्षा आंदोलनाची घोषणा केली आहे. तर याच मुद्यावरून बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. एखाद्या गुन्ह्यात जेव्हा पाच लोकं सहभागी असतात. तेव्हा ती चोरी नसते तो दरोडा असतो. इथे पाच पेक्षा जास्त लोकं आहेत, त्यामुळे राम मंदिरावर दरोडा पडलाय असं म्हणत राऊतांनी टीकास्त्र सोडलं. तसेच फक्त देणग्यांवर नव्हे तर प्रभू रामाच्या आभूषणांवरही डल्ला मारला असून ते चोरीला गेले आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

काय म्हणाले राऊत ?

काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एल्गार पुकारला, त्यांनी राम मंदिराच्या लुटीविरोधात घोषणा केल्यानंतर मग संघाने भूमिका मांडली. आधी का नाही मांडली ? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. या आंदोलनाची ठिणगी पडली तर वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही हे त्यांना माहीत आहे, असं राऊत म्हणाले. राम मंदिर ट्रस्ट बरखास्त करा. एक पक्षीय ट्रस्ट नको, हा भाजपचा ट्रस्ट आहे. संघाने भाजपच्या बाजूने बोलू नये. राम भक्तांच्या बाजूने बोलावं. भाजपची कातडी वाचवण्यासाठी संघ स्वत:ची ढाल देत आहे. मुंबईत आंदोलन उद्या आहे. ते महाराष्ट्रात सर्वत्र पसरेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

प्रभु श्रीरामांच्या आभूषणांवरही डल्ला

माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले. केवळ राम मंदिरातील देणग्यांवर नव्हे तर प्रभू श्रीरामाच्या आभूषणांवरही डल्ला मारण्यात आला. प्रभू रामाचा मुकुट, त्यांचीसर्व आभूषणे, कंठातील हार, सीतामाईची कर्णफुले, सीतामाईच्या गळ्यातील हार, हे चोरीला गेलं आहे. श्रीरामाच्या पादूकाही चोरीला गेल्या, असा आरोप राऊत यांनी केला. तुम्ही म्हणताय संयम आणि धैर्य पाळा. रामाचा मुकुट, सिंहासन आणि कर्णफुले चोरीला जात आहे, आणि तुम्ही म्हणताय संयम पाळा. अब संयम का बांध टुटा है. संयम राहणार नाही, अशा शब्दांत त्यांनी थेट इशारा दिला.

Follow Us
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी खाद्य तेलाबाबत घोषणा केलीच...
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी घोषणा केलीच...  खाद्य तेलाबाबत एफडीएकडून कडक नियमावली
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरेंवर
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरे गटावर निशाणा!
पोलिस संरक्षण काढून ये मग... फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर,
Video : पोलिस संरक्षण काढून ये मग...  फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कोर्टात काय...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेच्या वकीलांची मोठी मागणी
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टाकडे मोठी मागणी