AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप संकटात, भाजपने जागा दिल्या तर ठीक, अन्यथा स्वबळावर… ‘या’ मित्रपक्षाने केली मोठी घोषणा

भाजपला मोठा धक्का बसला आहे. महायुतीतील एका प्रमुख घटक पक्षाने जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. यामुळे भाजपसमोरील अडचण वाढली आहे.

महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप संकटात, भाजपने जागा दिल्या तर ठीक, अन्यथा स्वबळावर...  'या' मित्रपक्षाने  केली मोठी घोषणा
Devendra Fadnavis
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 23, 2025 | 7:57 PM
Share

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची चर्चा तयारी सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्षा तयारीत व्यस्त आहेत. अशातच आता भाजपला मोठा धक्का बसला आहे. महायुतीतील एका प्रमुख घटक पक्षाने जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. यामुळे भाजपसमोरील अडचण वाढली आहे. हा पक्ष कोणता आहे? आता या पक्षाने काय घोषणा केली याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर निवडणूक स्वबळावर लढवा – आठवले

सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आगामी पालिका निवडणूकीबाबत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. ‘स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपाने जागा दिल्या तर ठीक नाही तर स्वबळावर निवडणुका लढवा’ असं आठवले यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. त्यामुळे आता जागावाटपावरून महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे-शरद पवार आणि काँग्रेससोबत युती नाही – आठवले

पुढे बोलताना रामदास आठवले यांनी, कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे-शरद पवार आणि काँग्रेस पक्षाशी युती न करण्याच्या सक्त सूचनाही कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. त्यामुळे भाजपसोबत युती झाली नाही तर आरपीआय आठवले गट स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठाकरे बंधुंच्या युतीवर भाष्य

रामदास आठवले यांनी ठाकरे बंधुंच्या युतीवरही भाष्य केलं आहे. ‘दोन्ही ठाकरे बंधु जरी एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या राजकारणावर बिलकुल परिणाम होणार नाही. उलट महायुतीला फायदाच होईल. दोन्ही ठाकरेंच्या सगळीकडे बातम्या येतील, मात्र महाराष्ट्रासह मुंबई महानगरपालिकेत त्यांना अजिबात यश मिळणार नाही. मुंबई महानगरपालिकेवर यंदा महायुतीचाच झेंडा फडकणार आहे.’

प्रकाश आंबेडकरांसोबत युती करणार का?

रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत युती करण्याबाबतही भाष्य केले आहे. ‘मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्रित आले तर दलित समाजाला अत्यानंद होईल. यामुळे महाराष्ट्राच्या उलथापालथ होईल. पण आंबेडकर कधी ऐक्यासाठी उत्सुक नव्हते. आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे आम्ही दोघे एकत्र येणे अशक्य आहे’ असं आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.

Follow Us
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?