‘त्यांच्या’ खात्यात 5000 जमा होणार, दानवे की बोली और बंदूक की गोली

जालना: भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील जालन्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघेही एकमेकांवर टोकाची टीका करत सुटले आहेत. जालन्यातील एका मेळाव्यात दानवेंनी खोतकरांवर त्यांच्या खात्यावरुन टीका केली.  “पशुसंवर्धन मंत्री एक बकरी आणली नाही राव आपल्या भागात. बकरी आणली असती तर लेंड्या आणल्या असत्या. […]

'त्यांच्या' खात्यात 5000 जमा होणार, दानवे की बोली और बंदूक की गोली
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

जालना: भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील जालन्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघेही एकमेकांवर टोकाची टीका करत सुटले आहेत. जालन्यातील एका मेळाव्यात दानवेंनी खोतकरांवर त्यांच्या खात्यावरुन टीका केली.  पशुसंवर्धन मंत्री एक बकरी आणली नाही राव आपल्या भागात. बकरी आणली असती तर लेंड्या आणल्या असत्या. ज्या मंत्र्यांनी बकरी नाही आणली,एक गाय नाही आणली, म्हैस नाही आणली. ते काही आणतील का” असा सवाल रावसाहेब दानवेंनी उपस्थित केला.

रावसाहेब दानवेंनी जाफराबाद शहरात आयोजित कामगार मेळाव्यात आणि विविध विकासकामाच्या उद्घाटनप्रसंगी जाहीर भाषणात टीका केली.

जालन्याच्या भाषेत दानवेंची टीका

“सगळेजण एक होऊन या आणि रावसाहेब दानवेला  पाडा. मला पाडायला तुम्ही माझी चिंता करू नका. मी या सगळ्यांचा बाप आहे, अशा शब्दात रावसाहेब दानवेंनी हल्ला चढवला.

यांना किती वेळा पाडले यार. सारे विरोधक काय करतात माहित आहे का?  विरोधक काही तरी कारणाने सभा घेतात. सेनेची सभा असली की राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले सभेला जातात.काँग्रेसची सभा असली की राष्ट्रवादीवाले आणि शिवसेनावाले जातात. सेनेची सभा असली की काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले सभेत जातात. जो उठला तो रावसाहेब दानवेंना शिव्या देतो. माघारी शिव्या देतात. भाषणात शिव्याच शिव्या देतात. आमच्या विरोधात शिव्याची लाखोली वाहिली जाते, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत मी भेटेन याबाबत निश्चितता नाही. कारण राज्यातील 48 मतदारसंघात मला प्रचार करायाचा आहे, असं दानवेंनी स्पष्ट सांगितलं.

त्यांच्या खात्यात 5 हजार रुपये

या (जालना) मतदारसंघात आम्ही काम करतो, कष्ट करतो असेही दानवेंनी म्हटलं. दोन हजार मजूर कामगारांची नोंदणी केली आहे. दोन चार दिवसात वेळ मिळाल्यास दहा- दहा हजार रुपयांचं ज्वार वाटप करणार असल्याचं आश्वासन दानवेंनी दिले. तसेच पाच हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करणार असल्याचं आश्वासनही दानवेंनी दिलं.

दानवेंची पुन्हा जीभ घसरली

या भाषणादरम्यान, रावसाहेब दानवेंनी मुस्लिम समाजाला दिलेल्या मदतीनंतर व्हॉट्सअपवर व्हायरल होणाऱ्या मेसेजचा उल्लेख केला.  आम्हाला 35 लाख कब्रस्तानच्या भिंतीला द्या आणि 15 लाखाचं सभागृह द्या अशी मागणी केली. ती मागणी मी पूर्ण केली. त्यानंतर काही मेसेज फिरत आहेत. “सध्या व्हॉट्सअपवर मेसेज फिरत आहेत, खैरात बाटी जा रही किल्ले मे, गाजरांचं काही तरी वाटणे चाललंय असे मेसेज व्हायरल होत आहेत. अरे भSSSSSSओ रावसाहेब दानवे की बोली और बंदूक की गोली. मायला यांच्या डोक्यात केस नाही, कंगवे कशाला देऊ राहिले यांना? , असं दानवे म्हणाले.

रावसाहेब दानवेंची बोली आणि बंदूक की गोली, मी 50 लाख देणार म्हणजे देणार, असं दानवे म्हणाले.

संबंधित बातम्या

रावसाहेब दानवेंची गावरान भाषेत अब्दुल सत्तार आणि खोतकरांवर टीका 

पराभव दिसल्यावर माणूस चवताळतो, दानवेंची अवस्था तशीच झालीय : खोतकर

दानवेंना पाडण्यासाठी सेनेचे मंत्री काँग्रेसचा ‘हात’ धरणार?

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.