पुन्हा बलात्काराने महाराष्ट्र हादरला, 24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार

गोंदियावरून पुण्याला जाणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडलीय.

पुन्हा बलात्काराने महाराष्ट्र हादरला, 24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार
प्रातिनिधिक फोटो

वाशिम : महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचार थांबण्याचं काही नाव घेत नाही. दररोज कुठे ना कुठे अत्याचाराच्या घटना घडत आहेत. गोंदियावरून पुण्याला जाणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडलीय. चालत्या खासगी बस ट्रॅव्हल्समध्ये विनयभंग करून वाशिमच्या मालेगाव परिसरात बलात्कार केल्याची घटना घडलीय. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. (Rape in bus 22 year Old Girl)

संबंधित तरुणीवरील बलात्काराची घटना 6 जानेवारीला घडलीय. या घटनेनंतर तरुणीचं मानसिक स्वास्थ खचलं होतं. पीडित तरुणीने पुण्यात पोहोचताच पोलिसांत तक्रार दिल्याने घडलेला सारा प्रकार समोर आला आहे.

आरोपीने पीडित तरुणीला सीट नंबर तुमची नसल्याचं कारण सांगून मागच्या सीटवर बसवले आणि त्यानंतर चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन  बलात्कार केला. तसंच घडलेल्या घटनेची वाच्यता केल्यास चालत्या गाडीतून फेकून देण्याची धमकी आरोपीने दिली.

धावत्या जगाचं, धावतं बुलेटीन, पाहा न्यूज टॉप 9, दररोज रात्री 9 वा. टीव्ही 9 मराठीवर

दरम्यान, पुणे पोलिसांनी वाशिम पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला असून पोलिसांनी घडलेल्या घटनेमधील गुडविल्स कंपनीची ट्रॅव्हल्स जप्त केली असून संबंधित आरोपी समीर देवकर असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. दरम्यान घटनेचा तपास मालेगाव पोलीस करत आहेत. (Rape in bus 22 year Old Girl)

संबंधित बातम्या

खुर्चीत बसून शारीरिक संबंधात तरुणाला गळफास, अटकेतील तरुणी प्रेयसी नव्हे, पत्नी?

पाण्याचा पाईप लावण्यासाठी गेलेल्या मुलीला उचलून नेलं, 13 वर्षीय मुलीवर बलात्कार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI