फॅक्ट चेक : दहावी-बारावीचं वेळापत्रक जाहीर? व्हाट्सअ‍ॅपवर व्हायरल होणारं वेळापत्रक खरं की खोटं?

फॅक्ट चेक : दहावी-बारावीचं वेळापत्रक जाहीर? व्हाट्सअ‍ॅपवर व्हायरल होणारं वेळापत्रक खरं की खोटं?

व्हाट्सअ‍ॅपवर सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक व्हायरल होत आहे (Reality check tenth and twelfth exam schedule viral message on what's app)

चेतन पाटील

|

Jan 23, 2021 | 8:09 PM

मुंबई : व्हाट्सअ‍ॅपवर सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये दहावीची परीक्षा 7 मार्च ते 25 मार्च असेल असा दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर या मेसेजमध्ये 7 मार्च ते 25 मार्चपर्यंतचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. याशिवाय बारावीची परीक्षा 28 फेब्रुवारी ते 22 मार्च दरम्यान होणार असल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. मात्र, हा दावा खोटा आहे. कारण दोन दिवसांपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबत मोठं विधान केलं आहे. त्यानुसार फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणे शक्य नाही हे सिद्ध होतं (Reality check tenth and twelfth exam schedule viral message on what’s app).

“दहावी बोर्डाची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. दहावी परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी घेण्यात येईल”, असं वर्षा गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितलं आहे (Reality check tenth and twelfth exam schedule viral message on what’s app).

त्याचबरोबर 12 वीच्या (उच्च माध्यमिक) प्रात्यक्षिक परीक्षा 1 ते 22 एप्रिल आणि लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे या कालावधीत होईल, अशी घोषणा वर्षा गायकवाड यांनी केली. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारा मेसेज हा चुकीचा आहे हे स्पष्ट होत आहे. सर्वामान्य नागरिक, विद्यार्थी आणि पालकांनी अशा व्हायरल होणाऱ्या चुकीच्या मेसेजवर विश्वास ठेवू नये.

कोरोना संकटामुळे परीक्षांना उशिर

कोरोनाच्या संकटामुळे अनेक ठिकाणी शाळा आणि कॉलेजेस बंद करण्यात आले होते. शहरी भागांमधील शाळा डिजीटल पद्धतीने सुरु होत्या. मात्र, बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागातील शाळा बंदच होत्या. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास विलंब झाला. आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्यानं जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत होतंय. एसएससी (10 वी) बोर्डाची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय. दहावी परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल.

कोविड 19 च्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय. राज्यात इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वीच्या शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असून, 18 जानेवारी 2021 रोजी 21 लाख 66 हजार 56 विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत आणि 21 हजार 287 शाळा सुरू आहेत. यात एका दिवशी केवळ पन्नास टक्के उपस्थिती ठेवून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सुमारे 76.8% विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत, अशी माहिती गायकवाड यांनी दिली आहे.

व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये नेमकं काय आहे?

संबंधित बातम्या :

Maharashtra School reopens | राज्यातील शाळा याच महिन्यात सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना तारीख सांगितली

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें