Shivsena: उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाचा बंडखोर आमदारांनी जरुर विचार करावा, शिवसेना खासदार अनिल देसाई यांचा सल्ला

सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाबाबत विचारले असता, कायद्याच्या तरतुदीप्रमाणे हे सर्व घडेल असे सांगत त्यांनी त्यावर जास्त भाष्य करण्यास नकार दिला आहे.

Shivsena: उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाचा बंडखोर आमदारांनी जरुर विचार करावा, शिवसेना खासदार अनिल देसाई यांचा सल्ला
उद्धव यांच्या आवाहनाचा विचार करावा - देसाई
Image Credit source: social media
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: संदिप साखरे

Jun 28, 2022 | 8:02 PM

मुंबई- बंडखोर आमदारांनी समोर यावे, तुमच्या भूमिकेचा विचार करु, अशा शब्दांत मुख्यमंत्रीपद बाजूला ठेवत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव (Uddhav Thackeray)ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाचा, बंडखोर आमदारांनी जरुर विचार कारावा, असे आवाहन शिवसेना खासदार अनिल देसाई (Anil Desai)यांनीही केली आहे. शिवसेना हा एक परिवार, कुटुंब आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांनी हा पक्ष स्थापन केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाचा आमदारांनी विचार करावा, असे अनिल देसाई म्हणाले आहेत.

कायदेशीर लढाई लढणार

सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाबाबत विचारले असता, कायद्याच्या तरतुदीप्रमाणे हे सर्व घडेल असे सांगत त्यांनी त्यावर जास्त भाष्य करण्यास नकार दिला आहे. फ्लोअर टेस्टच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने काल एक निर्णय दिलेला आहे. आमदार यांच्या कारवाईसंदर्भात १२ तारखेनंतर त्यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे कोर्टाच्या न्यायप्रविष्ठ प्रकरणांमध्ये, फ्लोअर टेस्टसारख्या मागण्यांनी अडथळे निर्माण करण्यात येतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. यात कायद्याच्या तरतुदीप्रमाणे पुढील गोष्टी होतील. याबाबत भाष्य करणं ठीक होणार नाही, असे देसाई म्हणाले.

आम्हाला काय करायचं आहे ते नेतृत्व ठरवेल

देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहा यांच्यात झालेल्या दिल्लीतील भेटीबाबत विचारले असता, भाजपचे नेते काय करत आहेत, त्यांच्या हालचाली काय आहेत. ते माध्यमांतून आम्हाला समजत आहेत. त्यामुळे आता आम्ही काय करायचं काय नाही हे पक्षनेतृत्व ठरवेल, असेही अनिल देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा

मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. यात विश्वास दर्शक ठराव, पक्षासमोरील आव्हाने याबाबत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. त्यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील पावसाची स्थिती, कोरोनाची स्थिती याबाबत चर्चा करण्यात आल्याच माहिती आहे. तसेच औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली आहे. उद्या होणाऱ्य बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील साडे सात हजार पोलिसांच्या भरतीला परवानगी देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीपूर्वी शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्याशी उद्धव ठाकरे यांचे फोनवरुन बोलणे झाले. मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले आहे. विश्वासदर्शक ठराव आल्यास त्याला सामोरे जाण्याची भूमिकाही या बैठकीत मांडण्यात आल्याची माहिती आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें