संजय मंडलिकच बेन्टेक्स निघाले; गद्दार खासदार म्हणत शिवसैनिकांचा कोल्हापुरात मोर्चा

संजय मंडलिकांनी त्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, शिवसैनिकांना उत्तर द्यायला तुम्ही काय प्रशासकीय यंत्रणा नाही अशा स्पष्ट शब्दात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर शिवसैनिकांचा रोष अधिकच वाढला आहे. त्यामुळे आता प्रशासकीय यंत्रणांनाच घेऊन तुम्ही निवडणूक लढवा असं स्पष्ट शब्दात त्यांना उत्तर देण्यात आले आहे.

संजय मंडलिकच बेन्टेक्स निघाले; गद्दार खासदार म्हणत शिवसैनिकांचा कोल्हापुरात मोर्चा
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 1:45 PM

कोल्हापूरः शिवसेनेतून बंडखोरी करून मुंबई-सुरत-गुवाहाटी-गोवा आणि पुन्हा मुंबई असा प्रवास करुन नुकताच शिंदे-फडणवीस सरकारचा शपथ विधी झाला आहे. त्यानंतर शिवसैनिकांचा रोष न थांबता तो अधिक तीव्र झाल्याचे आज कोल्हापूरात पाहायला मिळाले. कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक (Shivsena MP Sanjay Mandlik) शिंदे गटात सामील झाल्याने संजय पवार आणि विजय देवणे यांच्या नेतृत्त्वाखाली कोल्हापुरात संजय मंडलिकांच्या घरावर गद्दार खासदार अशा जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. शिंदे गटात ज्यावेळी कोल्हापुरचे (Kolhapur Shivsena Morcha) माजी आमदार राजेश क्षीरसागर शिंदे गटात सामील झाले होते, त्यावेळी खासदार संजय मंडलिक यांनी गेले ते बेन्टेक्स राहिलं ते खरं सोनं अशी टीका केली होती, त्यांच्या त्याच वाक्याला धरून आज गद्दार खासदार म्हणत कोल्हापूरात आज शिवसैनिकांना मोर्चा काढला.

यावेळी खासदार संजय मंडलिकांना कोल्हापुरात आम्ही फिरू देणार नाही, असा इशारा कोल्हापुरातील शिवसैनिकांनी दिला आहे.

तुम्ही काय प्रशासकीय यंत्रणा नाही

कोल्हापुरचे खासदार संजय मंडलिक यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर कोल्हापुरातून त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या मंडलिकांनी शिंदे गटातील प्रवेशबाबत उत्तर द्यावं अशी टीका करण्यात आली होती, त्यानंतर संजय मंडलिकांनी त्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, शिवसैनिकांना उत्तर द्यायला तुम्ही काय प्रशासकीय यंत्रणा नाही अशा स्पष्ट शब्दात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर शिवसैनिकांचा रोष अधिकच वाढला आहे. त्यामुळे आता प्रशासकीय यंत्रणांनाच घेऊन तुम्ही निवडणूक लढवा असं स्पष्ट शब्दात त्यांना उत्तर देण्यात आले आहे.

प्रशासकीय यंत्रणेनं निवडून आणलं का

शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसैनिकांना आपण स्पष्टीकरण देणार नाही असं संजय मंडलकांनी स्पष्ट केले होते, त्यानंतर आज शिवसैनिकांनी त्यांच्यावरचा रोष व्यक्त करताना सांगितले की, तुम्ही मतदारांच्या आणि शिवसैनिकांच्या जीवावर निवडून आला आहात त्यामुळे आता आम्हाला जर स्पष्टीकरण देणार नसाल तर ज्यावेळी निवडणुकीला उभा राहिलात त्यावेळी प्रशासकीय यंत्रणेनं तुम्हांला निवडून आणलं का असा सवालही शिवसैनिकांनी कोल्हापुरात उपस्थित केला आहे.

मोर्चात मंडलिकांचा बेन्टेक्सच्या फोटोने लक्ष वेधलं

कोल्हापुरात गद्दार खासदार अशा घोषणा देत शिवसैनिकांनी संजय मंडलिकांच्या घरावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये मंडलिकांना घातलेल्या बेन्टेक्सच्या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. राजेश क्षीरसागर ज्यावेळी शिंदे गटात सामील झाले होते, त्यावेळी त्यांच्यावर टीका करताना त्यांना त्यांनी बेन्टेक्स म्हणून टीका केली होती, मात्र आता मंडलिकच बेन्टेक्स निघाले असल्याची टीका संजय पवार यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.