गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन समिती मार्फत पदवी व पदविका अभ्यासक्रम; शासन निर्णय जारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेस गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या नावाने स्वतंत्र पदवी व पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचे स्वायत्त बहाल करण्यात आले आहे. याबाबतचा शासननिर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने निर्गमित केला आहे.

गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन समिती मार्फत पदवी व पदविका अभ्यासक्रम; शासन निर्णय जारी
धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री


मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनेक वर्षे केवळ कागदावर राहिलेल्या स्व. गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या सल्लागार समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत सातत्यानं पाठपुरावा केला होता. या सल्लागार समितीत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्यासह शिक्षण तज्ज्ञ डॉ. प्रभाकर कराड, कायदा तज्ज्ञ ऍड. संजय काळबांडे, शिक्षण तज्ज्ञ प्रा.वसंत सानप, समाजशास्त्र अभ्यासिका डॉ. स्मिता अवचार, उद्योजक सुनील किर्दक, अर्थतज्ज्ञ डॉ. आर. एस. सोळंके, कृषितज्ज्ञ निवृत्त भा. प्र. से. डॉ. भास्कर मुंडे, समाजशास्त्र अभ्यासक डॉ. भारत खैरनार व अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र काळे यांचा समावेश करण्यात आला आहे. (Reorganization of Advisory Committee of Gopinathrao Munde Rural Development and Research Institute)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेस गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या नावाने स्वतंत्र पदवी व पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचे स्वायत्त बहाल करण्यात आले आहे. याबाबतचा शासननिर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने निर्गमित केला आहे. या पदवी व पदविका संस्था व विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. सल्लागार मंडळास आवश्यक असणारा निधी, त्याचे स्वतंत्र लेखापरीक्षण तसेच फेलो, सिनिअर फेलो अशा विविध पदांची व कंत्राटी पदांची भरती करण्याबाबतही मुभा देण्यात आली आहे.

सल्लागार मंडळाला आणि संस्थेस मूर्त स्वरूप प्राप्त

ग्रामीण कौशल्य विकास, शेतीआधारीत विशेष शिक्षण आदी महत्वाच्या विषयांशी संलग्न असलेली ही संस्था मागील अनेक वर्षांमध्ये केवळ घोषणा व कागद इतकीच मर्यादित राहिली होती. मात्र, धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या सल्लागार मंडळाला आणि संस्थेस मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. धनंजय मुंडे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे याबद्दल आभार मानले आहेत.

ज्येष्ठ नागरिकांसाठी शरद शतम आरोग्य कवच विमा योजना

राज्यातील 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून किमान एकदा आरोग्य तपासणी/चाचण्या करणे, त्यांना शरद शतम आरोग्य कवच विमा योजना लागू करणे या धनंजय मुंडे यांच्या महत्वाकांक्षी योजनेला कार्यान्वित करण्यासाठी ना. धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांची या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल, एन यु एच एमचे अतिरिक्त संचालक डॉ. सतीश पवार, डी एम ई आरचे उपसंचालक डॉ. अजय चांदनवाले, जे जे रुग्णालयातील डॉ. विनायक सावर्डेकर, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, ग्रामविकास विभागातील आस्थापना उपसचिव, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे आस्थापना उपसचिव हे या समितीमध्ये सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.

इतर बातम्या : 

काँग्रेसकडून राज्यसभेसाठी रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महाविकास आघाडी नेत्यांना विजयाचा विश्वास

चुकीचं काहीही केलं नाही, सोमय्या केवळ बदनामी करताहेत; अनिल परब यांचा दावा

Reorganization of Advisory Committee of Gopinathrao Munde Rural Development and Research Institute

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI