निवृत्त पोलीस हवालदाराची पत्नी, मुलासह आत्महत्या; आत्महत्येचं कारण वाचून हादराल

निवृत्त पोलीस हवालदार‌ाने पत्नी आणि मुलासह गळफास लावून आत्महत्या केली आहे. सांगली जिल्ह्यातील बेळंकी गावात ही घटना घडली आहे.

निवृत्त पोलीस हवालदाराची पत्नी, मुलासह आत्महत्या; आत्महत्येचं कारण वाचून हादराल

सांगली : सांगलीमध्ये कौटूंबिक आत्महत्येची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. निवृत्त पोलीस हवालदार‌ाने पत्नी आणि मुलासह गळफास लावून आत्महत्या केली आहे. सांगली जिल्ह्यातील बेळंकी गावात ही घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस दलही हादरले आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. (retired police constable commits suicide with Wife and son in sangali)

मिळालेल्या माहितीनुसार, अन्नासो गुरसिद गव्हाणे (वय 65) असं आत्महत्या करणाऱ्या निवृत्त पोलिसाचं नाव आहे. तर मालन अन्नासो गव्हाणे (वय 50) पत्नी आणि मुलगा महेश अन्नासो गव्हाणे अशी मृतांची नावे आहेत. एकाच घरातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे गावात खळबळ माजली आहे.

अधिक माहितीनुसार, मुलगा महेश गव्हाणे याला शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात कर्ज झाल्यामुळे कर्जबाजारीतून कुटुंबाने आत्महत्या केली असल्याची गावात चर्चा आहे. मात्र, याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर आत्महत्येची माहिती लागतात गव्हाणे यांच्या घराजवळ ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून तिघांचाही मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर तिघांनी आत्महत्या करण्याइतकं टोकाचं पाऊल का उचललं? याचा पोलीस शोध घेत आहे. यासाठी अन्नासो गव्हाणे यांच्या पोलीस मित्रांची, कुटुंबीयांची आणि शेजाऱ्यांचीही चौकशी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (retired police constable commits suicide with Wife and son in sangali)

संबंधित बातम्या – 

आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पुतण्याला ईडीकडून अटक; पीएमसी घोटाळा भोवणार?

नागपुरात हत्येचं सत्र थांबता थांबेना; आता पुतण्याने का केली काकाची हत्या?

तरुणाचा विवाहितेवर जडला जीव, नकार दिल्यामुळे विहिरीत ढकलून केली हत्या

(retired police constable commits suicide with Wife and son in sangali)

Published On - 11:55 am, Sat, 23 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI