नागपूरच्या तांदूळ घोटाळ्यात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता, रेशन दुकानदार संघटना फडणवीसांच्या भेटीला

नागपूर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गुड्डू अग्रवाल यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे येत्या काळात भाजप तांदूळ घोटाळ्याचा मुद्दा लावून धरण्याची शक्यता आहे. प्रंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील तांदूळ घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे.

नागपूरच्या तांदूळ घोटाळ्यात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता, रेशन दुकानदार संघटना फडणवीसांच्या भेटीला
Devendra Fadnavis

नागपूर : रेशनवरील तांदूळ घोटाळा प्रकरणात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत नागपूर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गुड्डू अग्रवाल यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे येत्या काळात भाजप तांदूळ घोटाळ्याचा मुद्दा लावून धरण्याची शक्यता आहे. प्रंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील तांदूळ घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. यात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता रेशन दुकानदारांकडून व्यक्त केली जात आहे. (Ration shopkeepers meets Devendra Fadnavis in rice scam case)

तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत गेले आहेत. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यापर्यंत तांदूळ घोटाळ्याची व्याप्ती असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं होतं. या घोटाळ्यात अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी, राईस मिलचे मालक अडकण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. पूर्व विदर्भात पंतप्रधान जनकल्याण योजनेतील रेशनवरील तांदूळ घोटाळ्याचे आरोप होत आहेत त्याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत गेले असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. या तांदूळ घोटाळ्याची अद्याप चौकशी झाली नसल्यानं शंका वाढल्याचंही फडणवीस यांनी म्हटलंय. चौकशी झाल्यास अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. त्यात अन्न पुरवठा अधिकारी आणि राईस मिलच्या मालकांचा समावेश असण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पूरग्रस्तांना विम्याचे पैसे लवकर मिळावे, फडणवीसांचं अर्थमंत्र्यांना साकडं

नुकत्याच आलेल्या महापुरामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना विम्याचे पैसे लवकर मिळावेत, या मागणीसाठी आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सुद्धा उपस्थित होते. पुराच्या स्थितीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठे नुकसान झालेल्यांना विमा कंपन्यांकडून पैसे लवकरात लवकर मिळावे, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विनंती केली. त्यामुळे मोठा दिलासा दुकानदारांना मिळू शकेल.

एखाद्या बँकेवर आर्थिक निर्बंध आल्यास त्या स्थितीत बँकेच्या खातेधारकांना आता 1 लाख रूपयांऐवजी 5 लाख रूपये काढता येणार आहेत. अर्थात 5 लाखांपर्यंतची त्यांची गुंतवणूक सुरक्षित होणार आहे. या निर्णयाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी निर्मला सीतारामन यांचे मन:पूर्वक आभार मानले. यासंदर्भातील विधेयक सुद्धा संसदेत पारित झाले, ही अतिशय आनंदाची बाब आहे. यामुळे लघु ठेविदारांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या : 

फडणवीसांना कायद्याचे पेच जास्तच माहीत, त्यांचा वकिली सल्लाही घेऊ; संजय राऊतांचा टोला

आघाडी सरकारला आरक्षण द्यायचंच नाहीये, त्यामुळेच वेळकाढूपणा सुरू आहे; फडणवीसांचा दिल्लीतून हल्लाबोल

Ration shopkeepers meets Devendra Fadnavis in rice scam case

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI