Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाणे स्थानकात उभा राहणार ११ मजली टॉवर, RLDA चे टेंडर, पाहा काय आहेत सुविधा

ठाणे रेल्वे स्थानकात ठाणे महानगर पालिका आणि रेल्वे जमीन विकास प्राधिकरण संयुक्तपणे मल्टी मोडल ट्राझिस्ट हब उभारत असून यात ११ मजली टॉवर उभारण्याची योजना आहे. या टॉवरमधील जागेचा विकास आणि व्यावसायिक वापरासाठी रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाने टेंडर काढले आहे.

ठाणे स्थानकात उभा राहणार ११ मजली टॉवर, RLDA चे टेंडर, पाहा काय आहेत सुविधा
Follow us
| Updated on: Jan 08, 2025 | 1:04 PM

मध्य रेल्वेचे सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे. या स्थानकाचा पुनर्विकासात ११ मजली भव्य टॉवर उभारण्यात येणार असून त्यात बेसमेंटमध्ये पार्किंग आणि इतर आठ मजल्यांचा कमर्शियल वापर होणार आहे. रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाने  ( RLDA ) या संदर्भात निविदा मागविली आहे.रेल्वे जमीन विकास प्राधिकरण आणि ठाणे महानगर पालिका ठाणे रेल्वे स्थानकाचा मल्टी मोडल ट्राझिस्ट हब म्हणून सॅटीस अंतर्गत विकास करत आहे. या विकासात ठाणे पूर्वेकडील जागेत ९००० चौरस मीटर जागेचा व्यावसायिक विकास केला जाणार आहे.

ठाणे रेल्वे स्थानकाचा असा होणार कायापालट – पाहा प्लान

हे सुद्धा वाचा

ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला असलेल्या १० (अ ) प्लॅटफॉर्मजवळील जागेचा विकास केला जात आहे. या जागेवर ११ मजली टॉवर – १ उभारला जामार आहे. यात बेसमेंटला वाहनांच्या पार्किंग आणि सर्व्हीसची सुविधा असणार आहे. तर तळमजला आणि पोट मजल्यावर रेल्वे सुविधा आणि कॉनकोर्स फ्लोअर प्रवाशांच्या बसेससाठी असणार आहे. आणि आठ अतिरिक्त मजल्यांचा व्यावसायिक वापर केला जाणार आहे.

रेल्वे जमीन विकास प्राधिकरण ( RLDA ) आठ मजल्यातील २४,२८० चौरस मीटर बिल्टअप जागा ६० वर्षांच्या भाडे करारावर देणार आहे. भाडेतत्त्वावरील क्षेत्र बेअर-शेल संरचना म्हणून दिले जाणार आहे. तर कॉमन एरिया आणि युटिलिटीजचे बांधकाम RLDA करणार आहे. हा ११ मजली टॉवर-१ इमारत बांधून झाल्यानंतर त्यातील जागा भाडेतत्त्वावरील जागा ३० जून २०२६ पर्यंत हस्तांतरित केली जाणार आहे. या संदर्भातील निविदा १५ जानेवारी २०२५ रोजी स्वीकारण्यात येणार आहेत.निविदा भरण्याची शेवटची तारीख आणि उघडण्याची तारीक ३१ जानेवारी २०२५ असणार आहे.

मेट्रो, बस आणि रेल्वे एकाच छताखाली

सॅटीस अंतर्गत चांगल्या कनेक्टीव्हीटीसाठी २.२४ किलोमीटरचा वर्तुळाकार एलिव्हेटेड रोड लिंक स्पॅनिंग ठाणे महानगर पालिका उभारणार आहे. हा मार्ग पूर्वद्रुतगती महामार्ग ते ठाणे रेल्वे स्थानक पूर्व असा असणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १० येथील एलिवेटेड डेकला हा मार्ग जोडण्यात येणार आहे.या मार्गामुळे प्रवाशांना कॉनकोर्सला पोहचता येणार आहेच शिवाय इतर व्यावसायिक कारणांसाठी येणाऱ्या नागरिकांना हा मार्ग सोयीचा होणार आहे. येथे मल्टी मोडल ट्राझिस्ट हब अंतर्गत बस,रेल्वे,आणि मेट्रो जोडली जाणार आहे.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.