वकिलाच्या कानशिलात लावेल त्याचा मी…, हगवणेंच्या वकिलाच्या युक्तिवादावर रोहिणी खडसेंचा संताप
Vaishnavi Hagawane Death Case: नवऱ्याने मारहाण करणे हा कौटुंबिक हिंसाचार होऊ शकत नाही... असं म्हणणाऱ्या वकिलावर रोहिणी खडसेंचा संताप ट्विट करत म्हणाल्या, 'जो त्या वकिलाच्या कानशिलात लगावेल त्याचा मी...'

Vaishnavi Hagawane Death Case: नवऱ्याने मारहाण करणे हा कौटुंबिक हिंसाचार होऊ शकत नाही… असे अनेक धक्कादायक दावे हगवणे कुटुंबियांच्या वकिलाने न्यायालयात केले आहेत. शिवाय वैष्णवी हिच्या चारित्र्यावर देखील संशय घेण्यात आला आहे. वैष्णवी ही अन्य पुरुषासोबत चॅट करत होती… असा दावा देखील हगवणे कुटुंहियांच्या वकिलांना गुरुवारी झालेल्या सुनावणी दरम्यान केला. वैष्णवी हिच्या चारित्र्यावर संशय घेतल्यानंतर अनेकांनी वकिलावर संताप व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही देखील वकिलांवर हल्लाबोल करत संताप व्यक्त केला आहे. रोहिणी खडसे यांनी एक ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. ‘जो त्या वकिलाच्या कानशिलात लगावेल त्याचा मी सत्कार करेल…’ असं ट्विट रोहिणी खडसे यांनी केला आहे. सध्या महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे प्रकरण समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळी आहे.
गुरुवारी झालेल्या युक्तीवादानंतर हगवणे कुटुंबियांचे वकिल देखील वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे हगवणे कुटुंबियांच्या वकिलांवर देखील 2022 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. हगवणे कुटुंबियांची बाजू मांडणाऱ्या वकिलांचं नाव विपुल दुशिंग असं आहे. विपुल दुशिंग यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत.
#वैष्णवी_हगवणे #हुंडाबळी pic.twitter.com/LSXGPHzW4R
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) May 28, 2025
वैष्णवी ची चॅटिंग एका व्यक्तीसोबतची आम्ही दाखवू शकतो आणि नवऱ्याने मारहाण करणे हा कौटुंबिक हिंसाचार होऊ शकत नाही असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने सध्या विपुल दुशिंग यांच्यावर टीका होत आहे. हगवणे कुटुंबाची बाजू मांडणाऱ्या या वकिलावर याआधी 2022 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. वकिलाची कॉलर पकडून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुरुवारी झालेल्या सुनावणीत, वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंद यांची पोलीस कोठडी 1 दिवसाची वाठ करण्यात आली आहे. तर दीर आणि सासऱ्याची पोलीस कोठडी 31 मे पर्यंत वाढवण्यात आली. सध्या पोलीस याप्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. सध्या सोशल मीडियावर वैष्णवी हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
