AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : मुख्यमंत्र्यांकडून शब्दांचा खेळ, गुन्हेगारीत महाराष्ट्र UP,बिहारच्या पुढे चाललाय; रोहित पवारांकडून जुन्नरच्या घटनेवरून संताप

मुख्यमंत्र्यांकडून शब्दांचा खेळ केला जात आहे. परंतु महाराष्ट्र गुन्हेगारीत UP,बिहारच्या पुढे चाललाय, असं म्हणत रोहित पवारांनी सरकारवर टीका केली आहे.

Rohit Pawar : मुख्यमंत्र्यांकडून शब्दांचा खेळ, गुन्हेगारीत महाराष्ट्र UP,बिहारच्या पुढे चाललाय; रोहित पवारांकडून जुन्नरच्या घटनेवरून संताप
rohit pawar Image Credit source: tv9
| Updated on: Aug 19, 2026 | 11:17 AM
Share

पुण्यातील जुन्नरमध्ये एका 10 वर्षीय चिमुकलीची अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे. नसरापूरसारखीच घटना जुन्नरच्या पिंपळवडीमध्ये घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. सत्ताधारी आमदाराच्या गावातच चिमुकलीवर अत्याचार करून हत्या झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेवरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनीही संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे. गुन्हेगारीत आता महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पुढे चालला आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी जुन्नरच्या घटनेवरून संताप व्यक्त केला आहे.

रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर संताप 

रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवारांनी चिमुकलीच्या हत्येवरून संताप व्यक्त केला. रोहित पवार म्हणाले, ‘ स्थानिक आमदार हे सत्ताधारी आहेत. त्यांच्या गावात अशा घटना घडत असतील, तर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती किती हलाखीची झाली आहे, हे सिद्ध होत आहे. अनेक वेळा हा मुद्दा घेतला. अधिवेशनात हा मुद्दा उचलला. ज्या मुलींवर अत्याचार झाले, त्या पीडित कुटुंबाला याची किंमत मोजावी लागली आहे. आम्ही या पीडित कुटुंबांनाही भेटलो. त्यासोबत वकिलांना देखील भेटलो’.

महाराष्ट्रात शक्तीसारखा कायदा आणा  – रोहित पवार 

‘सातत्याने काही आकडे सरकारसमोर मांडत आहोत. खरंतर शक्तीसारखे कडक कायदे महाराष्ट्रात आणावा लागेल. दुर्दैवाने असं की, देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. ते शब्दाचा खेळ करतात. आकडेवारीतून सांगतो की, महाराष्ट्र उत्तर प्रदेश, बिहारच्या पुढे चालला आहे. परंतु मुख्यमंत्री फडणवीस हे आकडेवारीचा खेळ करून यावरील लक्ष दुसरीकडे नेतात. महाराष्ट्रात अत्याचार होत आहेत. मुली, महिलांवर अत्याचार होत आहेत. अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कायदा आणि पोलिसांची भीती कमी झाली आहे. पोलिसांचा वापर हा व्हिआयपी, आमदार, खासदारांना संरक्षण देण्यासाठी वापरला जात आहे. त्यामुळे सामान्य घरातील मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहे, असा आरोप रोहित पवारांनी केला.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात