AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीएच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणात महत्त्वाची अपडेट; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया, बारामतीमधील एका समस्येवर ठेवलं बोट

पीएच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणावर रोहित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पीएच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणात महत्त्वाची अपडेट; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया, बारामतीमधील एका समस्येवर ठेवलं बोट
rohit pawar news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 23, 2026 | 2:31 PM
Share

आमदार रोहित पवार यांच्या पीएच्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूने एकच खळभळ उडाली आहे. आई-मुलीचे किरकोळ भांडण झाले. त्यानंतर मुलगी रात्री घराबाहेर पडली होती. परंतु तिचा दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला. तिची चप्पल एका इमारतीच्या टेरेसवर आढळली आहे. त्यामुळे या प्रकरणात वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. आता या प्रकरणावर रोहित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आता सांगता येणार नसल्याचे स्पष्ट केले

रोहित पवारांनी ठेवलं बारामतीमधील या समस्येवर बोट

आमदार रोहित पवार यांना दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांनी बारामती गाठली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या पाहणीनंतर रोहित पवार म्हणाले, ‘आता याच्यात नेमकं खरं काय घडलं, हे सांगता येणार नाही. त्यामुळे या घटनेसाठी पोलीस प्रशासन जबाबदार आहे का, हे आता सांगता येणार नाही. काही वर्षापूर्वी अजितदादांनी स्वत: पाठपुरावा करून बारामती शहरासाठी प्रत्येक कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरा मंजूर केला होता. या गोष्टीला अनेक वर्ष जाऊन सुद्धा…सीसीटीव्हीचा प्रकल्प गृह विभागाने मंजूर केला नाही. एका इमारतीला सीसीटीव्ही आहेत दुसऱ्या इमारतीला सीसीटीव्ही नाहीत. आसपासच्या विभागात सीसीटीव्ही नसल्याने या तपासाला वेळ लागण्याची शक्यता आहे’.

पोलीस काय म्हणाले?

रोहित पवारांच्या (Rohit Pawar) पीएच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणावर पोलिसांची देखील पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पोलीस अधिकारी म्हणाले, ‘आता प्रथम दर्शनी नेमकं काय झालं, अद्याप सांगता येणार नाही. पोस्टमार्टम रिपोर्ट येणे बाकी आहे. मुलीला जखमा आहेत. तिचा हात आणि पाय मोडलेला आहे. संबंधित जखमा नेमक्या कशा, या पोस्ट मार्टमनंतर डॉक्टरांशी बोलू. त्यानंतर तपासाला वळण मिळेल. या मुलीची चप्पल टेरेसवर आढळली. त्यामुळे इमारतीवरून तिने उडी मारली का, याचा तपास सुरू आहे’. आता या प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट येणे बाकी आहे. अवघ्या 12 वर्षांच्या मुलीने खळबळ उडाली असून संपूर्ण बारामतीकरांचं (Baramati) लक्ष या प्रकरणाकडे लागलं आहे.

Follow Us
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?