रोहित पवार यांनी थेट सत्ताधाऱ्यांकडे केली मोठी मागणी, अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर, थेट..

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर मोठी खळबळ उडाली. यादरम्याच आमदार रोहित पवार गंभीर आरोप करत आहेत. यादरम्यान त्यांनी नुकताच राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना मोठी साद घातली.

रोहित पवार यांनी थेट सत्ताधाऱ्यांकडे केली मोठी मागणी, अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर, थेट..
Rohit Pawar and Ajit Pawar
| Updated on: Feb 27, 2026 | 12:42 PM

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आमदार रोहित पवार आक्रमक भूमिकेत आहेत. मुंबई पोलिस ठाण्यात अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर एफआयआर दाखल करण्यासाठी रोहित पवार पोहोचले होते. मात्र, मुंबई पोलिसांनी एफआयआर घेण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. पोलिस ठाण्यात पोलिसांसोबत रोहित पवारांचा वादही होताना दिसला. त्यानंतर वकिलांची मोठी फाैज घेऊन रोहित पवार बारामती पोलिस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी कार्यकर्तेही पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने पोहोचले. घोषणाबाजी केली जात होती. यावेळी रोहित पवार यांच्यासोबत युगेंद्र पवारही होते. मात्र, बारामती पोलिसांनी एफआयआरची नोंद केली नाही. त्यानंतर आज रोहित पवार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीस पोहोचले. यावेळी त्यांनी काही वेळ राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. अजित पवार यांच्या अपघाताबद्दलचे काही मुद्दे सांगण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे गेल्याचे रोहित पवार यांनी म्हटले.

यावेळी माध्यमांसोबत बोलताना रोहित पवार यांनी म्हटले की, तुम्ही सत्तेत आहात FIR नोंद होण्यासाठी किमान मदत करा. कारण रोहित पवार गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एफआयआर नोंदवण्याकरिता प्रयत्न करत आहेत. यासोबतच पोलिसांवर कोणाचातरी दबाव असल्याचेही रोहित पवार यांनी म्हटले. मात्र, सत्तेत आहात किमान एफआयआर नोंदवण्यास तरी मदत करा, असे रोहित पवार यांनी नक्की कोणाला म्हटले हे कळू शकले नाही.

सुनेत्रा पवारही आजच्या घडीला सत्तेत आहेत, त्यांच्याकडून उपमुख्यमंत्रिपदही आहे. मात्र, अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार सतत एफआयआरकरिता मागणी करत आहेत. आता त्यांनी सत्ताधाऱ्यांना थेट साद घातली. विलीनीकरणाबद्दलही बोलताना रोहित पवार दिसले, रोहित पवार यांनी म्हटले की, विलीनीकरणाबद्दल कोण बोलत आहे?

यासोबतच आजच्या येणाऱ्या अहलावालाबद्दल बोलताना रोहित पवार यांनी म्हटले की, थातूरमातूर अहवाल दिला तर महाराष्ट्र तुम्हाला सोडणार नाही. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक संशय व्यक्त केली जात आहेत. कालच सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा आपल्याकडे घेत अध्यक्षपद आपल्याकडेच ठेवले आहे.

Follow Us