AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित पवार माझे मित्र, उद्या माझ्यासोबत मंत्रीही असू शकतात; नितेश राणेंचं खळबळजनक वक्तव्य, MPSC आंदोलनात थेट ऑफर

Nitesh Rane On Rohit Pawar: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात नितेश राणेंनी रोहित पवारांवर मोठं वक्तव्य केले आहे. यामुळे आता चर्चा होत आहेत.

रोहित पवार माझे मित्र, उद्या माझ्यासोबत मंत्रीही असू शकतात; नितेश राणेंचं खळबळजनक वक्तव्य, MPSC आंदोलनात थेट ऑफर
| Updated on: Oct 04, 2026 | 9:42 PM
Share

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाला आमदार नितेश राणेंनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आहे. यात त्यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. रोहित पवारांचं नाव घेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यामुळे आता राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळांना भेटण्यासाठी नितेश राणेंनी उपस्थिती लावली होती.

यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की, आमचा मुख्यमंत्री कोणाविषयी बोलत नाही. पुण्याला आदरणीय पवार साहेबांची पत्रकार परिषद पाहिली. राज्याच्या प्रमुखांसोबत सुसंवाद साधा असं सांगितलं आहे. कुणीही दुसऱ्यांनी हट्ट न करायला पाहिजे. सरकारने विद्यार्थ्यांच्या 13 पैकी 12 मागण्यात मान्य केलेल्या आहेत. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असल्याचे पाहायला मिळत आहे. सगळ्या गोष्टी समितीनुसार होणार आहेत. समितीदेखील हा मुद्दा मांडणार आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. यानंतर नितेश राणेंनी एक धक्कादायक वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले आहे.

ते म्हणाले की, रोहीत पवार माझे मित्र आहेत. त्यांना मी शत्रू मानत नाही. ते कदाचित उद्या माझ्यासोबत सरकारमध्ये मंत्री देखील असू शकतील. वस्तूनिष्ठ बोलला तर तेच होणार आहे. रोहित पवार आपण एकत्र लढू या. एमपीएससी संदर्भात सिस्टिममधील त्रुटी दूर करण्यासाठी आवाज उचलला जातो आहे. एमपीएससीचे वजन वाढण्यासाठी काम करत होतो. राज्य सरकार तुमच्या मनानुसार करत आहे. भारतीय संविधानाची प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी दिली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी तुमची जबाबदारी घेतलेली आहे. आंदोलनावर एक दिवस जल्लोष आणि फटाके फोडाल असा विश्वास तुम्हाला देतो, असं आश्वासन नितेश राणेंनी दिलं आहे.

तर दुसरीकडे संजय राऊतांनीही आज आंदोलनस्थळी भेट दिली आहे. त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, सरकार खोटं बोलत आहे. मुलं काय मुर्ख आहेत का? जर मागण्या मान्य झाल्या तर फुट का पाडता? सरकारला या प्रकरणात त्यांचे मन शुद्ध नाही आहे. दिल्लीत काय घडले याचा अभ्यास मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे. ही आपली पुढची पिढी आहे. सरकार निवडणुका घेत नाही ते स्पर्धा परिक्षा काय घेणार? हे आंदोलन एक होते फडणवीस सरकारने फुट पाडली. फोडा आणी झोडा ही त्यांनी नीती आहे. जी इंग्रजांची नीती आहे, असं म्हणत संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात