Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : 150 पट ताकद…अजितदादांच्या विमान अपघातामागचा रोहित पवारांनी राजकीय अँगल काय सांगितला?

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : "असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. कदाचित जे जिल्हा परिषदेतले अजितदादांच्या पक्षातले जे कोणी उमेदवार असतील, त्यांना हा मुद्दा कळेल. महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायतीचं इलेक्शन झालं होतं, तेव्हा दादाच सगळ्याचं नियोजन बघत होते"

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : 150 पट ताकद...अजितदादांच्या विमान अपघातामागचा रोहित पवारांनी राजकीय अँगल काय सांगितला?
Rohit Pawar
| Updated on: Feb 18, 2026 | 2:15 PM

“घातपाताचा एक दृष्टीकोन समजून घ्या. विलिनीकरणाची जी चर्चा सुरु होती, ती दादा आणि आम्हालाच माहिती आहे. एक चर्चा अशी होती की, एनडीए बरोबर आम्ही सत्तेत जाणार ही गोष्ट काही लोकांना आवडली नसावी. दुसरा दुष्टीकोन असा आहे की, दादाचं एनडीएमध्ये राहणार नाहीत. दादाचं बाहेर निघून रस्त्यावरची सामान्य लोकांची लढाई आमच्या सोबत लढतील हा दृष्टीकोन एक गटाला आवडला नसावा. यात राजकारण, यात घातपात असं म्हणायचं असेल तर दोन दृष्टीकोनांपैकी एक दृष्टीकोन कुठलातरी असावा, त्या दृष्टीकोनाला पाठिंबा देणारा एक गट असू शकतो” असं रोहित पवार म्हणाले. अजित पवार यांचा मागच्या महिन्यात विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघाताबद्दल ज्या काही शंका आहेत, त्या बद्दल रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

“असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. कदाचित जे जिल्हा परिषदेतले अजितदादांच्या पक्षातले जे कोणी उमेदवार असतील, त्यांना हा मुद्दा कळेल. महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायतीचं इलेक्शन झालं होतं, तेव्हा दादाच सगळ्याचं नियोजन बघत होते. आजच्या राजकारणात तीन इलेक्शन बघत असताना आपल्याला कशाची गरज असते, मार्गदर्शक प्रमाणपत्राची, कागदपत्रांची गरज असते. एक मोठं इलेक्शन असेल तर मार्गदर्शनपर कागदपत्र जास्त लागतात, छोटं इलेक्शन असेल तर कमी लागतात” असं रोहित पवार म्हणाले.

पण 50 पटच ताकद लावली गेली

“हा अपघात होण्यापूर्वी सगळं नियोजन दादा करायचे. पण त्या कागदपत्रांचं वितरण, मार्गदर्शन दुसरा कुठला तरी नेता करायचा. आम्हाला असही कळतय या जिल्हा परिषद, पंचायत समिती कागदपत्रांचं योग्य असं नियोजन झालं होतं. निर्णय असा झाला होता की, 200 पट ताकद मार्गदर्शक कागदपत्रांच्या माध्यमातून लावली जाणार. दुर्देवाने 28 ची घटना झाली. दादा नसताना 200 पट ताकद लावली जाणार होती. पण 50 पटच ताकद लावली गेली. 150 पट ताकद कमी लावली गेली अशी चर्चा आहे. 150 पट ताकद का लावली नाही?” असा सवाल रोहित पवार यांनी विचारला.