महाराष्ट्र, पंजाब ,तामिळनाडू कुठलाही शेतकरी असो , त्यांना सन्मानाची वागणूक द्या, रोहित पवारांचे केंद्राला खडे बोल

केंद्र सरकारनं आंदोलक शेतकऱ्यांना सन्मान देण्याची गरज असल्याचं मत रोहित पवारांनी व्यक्त केले. (Rohit Pawar Farmer Protest)

महाराष्ट्र, पंजाब ,तामिळनाडू कुठलाही शेतकरी असो , त्यांना सन्मानाची वागणूक द्या, रोहित पवारांचे केंद्राला खडे बोल
रोहित पवार. आमदार राष्ट्रवादी काँग्रेस

जळगाव: कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, असं म्हटलेय. शेतकरी गेल्या 60 दिवसांपासून त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक असो की तामिळनाडू असो शेतकरी हा शेतकरी असतो याचा विचार केंद्र सरकारनं करण्याची गरज आहे, असं रोहित पवार म्हणाले. ते सध्या जळगाव जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत. (Rohit Pawar said central government gave honour to Farmers of entire nation)

केंद्रानं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात

केंद्र सरकारनं 60 दिवसांपासून आंदोल करणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानानं वागवण्याची गरज आहे. शेतकरी आंदोलन सुरु झाले त्यावेळी त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारण्यात आले. त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला. रस्ते खोदण्यात आले या चुकीच्या गोष्टी होत्या, अशी टीका रोहित पवार यांनी केली. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना सन्मान देण्याची गरज असल्याचं मत पवारांनी व्यक्त केले.

26 जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीला राष्ट्रवादीचा पाठिंबा?

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमांवर 60 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. येत्या 26 जानेवारीला होणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे का? असा प्रश्न विचारला असता रोहित पवारांनी पक्षाची भूमिका काय आहे, हे माहिती नाही. मात्र, शरद पवार यांचा 26 जानेवारी रोजी होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितलं.

रोहित पवार रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी जळगावात

रोहित पवार जळगाव जिल्ह्यातील कजगाव येथे रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आले होते. डॉ.भूषण मगर यांच्या विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचं रोहित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. रुगालयाच्या उद्घाटनानंतर रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राज्यातील शेतकरी मुंबईकडे

केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघठनातर्फे आझाद मैदान येथे मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. नाशिकवरून शेतकऱ्यांचा मोठा जथ्था मुंबईत पोहोचत आहे. राज्याच्या इतर भागातून सुद्धा शेतकरी पोहोचत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मोर्चामध्ये उद्या हजर राहणार असून, काँग्रेस तर्फे बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सीपीआयचे नेते प्रकाश रेड्डी यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाला समर्थन दिले असल्याचं प्रकाश रेड्डी यांनी म्हणाले.

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांचं म्हणणं ऐका, कृषी कायदा रद्द करा; विरोधकांची राष्ट्रपतींकडे मागणी

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा सोनिया गांधींचा निर्णय

(Rohit Pawar said central government gave honour to Farmers of entire nation)

Published On - 2:39 pm, Sun, 24 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI