RSS ला 100 वर्ष पूर्ण, यंदाच्या दसरा मेळाव्याला रामनाथ कोविंद यांची प्रमुख उपस्थिती
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चा यंदाचा दसरा मेळावा हा खास असणार आहे. कारण यावर्षी संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चा यंदाचा दसरा मेळावा हा खास असणार आहे. कारण यावर्षी संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत, या विजयादशमीपासून संघाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागपुरात विजयादशमीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्याला उद्या सकाळी 7:35 वाजता सुरुवात होणार आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या दसरा मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सरसंघचालक मोहन भागवत हे दसरा मेळाव्याच्या निमित्तानं मार्गदर्शन करणार आहेत.
मोहन भागवत यांच्या भाषणाकडे लक्ष
या विजयादशमीला संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत, त्यामुळे हा दसरा मेळावा संघासाठी खास असणार आहे. संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत, त्याचसोबत यंदाच्या विजयादशमीपासून ते २०२६ च्या विजयादशमीपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष साजरे करणार आहे, या सर्व पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत उद्याच्या दसरा मेळाव्यात काय मार्गदर्शन करणार? संघ स्वयंसेवकांना कोणता संदेश देणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन
या विजयादशमीपासून संघाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे यंदाच्या विजयादशमीपासून ते २०२६ च्या विजयादशमीपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष साजरे करणार आहे, या काळात देशभरात विविध कार्यक्रामांचं आयोजन करण्यात येणार आहे. डॉ. हेडगेवार यांच्या घरी 17 जणांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती, १७ एप्रिल १९२६ रोजी झालेल्या बैठकीमध्ये या संघटनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव निश्चित करण्यात आलं. १९२६ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पहिला दसरा मेळावा पार पडला होता. यंदा संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत.
तीन ठिकाणांहून पथसंचन
उद्या विजयादशमीनिमित्त संघाचे तीन ठिकाणांहून पथसंचनल निघणार आहे, हे तिनही पथसंचलन सकाळी 7:45 वाजता नागपूरच्या व्हरायटी चौकात एकत्र येणार आहेत. पथसंचलनानंतर योगाचे प्रात्यक्षिकही सादर केली जाणार आहेत.
