RSS Vijayadashami Utsav | कोरोनामुळे संपूर्ण समाज एकरुप झाला : मोहन भागवत

यंदाच्या विजयादशमीला पहिल्यांदाच स्वयंसेवकांच्या कवायती नाही. त्यामुळे आरएसएसच्या पारंपारिक दसऱ्या सोहळा यंदा खंडित झाला आहे.

RSS Vijayadashami Utsav | कोरोनामुळे संपूर्ण समाज एकरुप झाला : मोहन भागवत

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज नागपुरात पार पडतो आहे (RSS Vijayadashami Utsav). यंदाच्या विजयादशमीला पहिल्यांदाच स्वयंसेवकांच्या कवायती नाही. त्यामुळे आरएसएसच्या पारंपारिक दसऱ्या सोहळा यंदा खंडित झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा संघाचा स्थापना दिवस साधेपणाने आणि कोरोनाच्या नियमांचं पालन करुन साजरा केला जात आहे. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शस्त्रपूजन केलं, त्यानंतर उत्सवाला सुरुवात झाली  (RSS Vijayadashami Utsav).

कोरोनामुळं यंदाचा विजयादशमी उत्सव हा खुल्या मैदानात न होता सभागृहात होत आहे. नागपुरातील हेडगेवार  सभागृहात हा उत्सव पार पडत आहे. त्यामुळे यंदा कुठलेही प्रात्यक्षिक झाले नाहीत. दरवर्षी या कार्यक्रमाला नागरिक आणि निमंत्रित मोठ्या संख्येनं सहभागी होतात. मात्र, यावर्षी फक्त 50 स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा उत्सव पार पडत आहे. प्रमुख अतिथी म्हणून कुणालाही आमंत्रित करण्यात आलेलं नाही.

यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना संबोधित केलं.

“संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या कमी स्वयंसेवकांमध्ये दसरा मेळावा पार पडतो आहे. कोरोना महामारीमुळं संपूर्ण समाज एकरुप झालेला पाहायला मिळतो आहे. सेवाभाव जो आपला समाज विसरला होता, तो पुन्हा जागृत झाला आहे. सेवा करता करता काही लोकांनी आपला जीव गमावला, त्यांना श्रद्धांजली आणि जे निस्वार्थ भावनेनं लोकांची सेवा करत आहेत त्यांचे अभिनंदन करतो”, असं मोहन भागवत म्हणाले.

“जगात सर्वाधिक चर्चा ही कोरोनाची झाली. सर्व महामारीत कोरोनामुळे भारतात सर्वात कमी नुकसान झालं आहे. याचं कारण म्हणजे याची सतर्कता बाळगत सरकारने सावधानता बाळगली. नागरिकांना सावध केलं, नियम लावले आणि त्या नियमांचे पालन होईल याचीही दक्षता बाळगली. यामध्ये माध्यमांनीही मोठं काम केलं. त्यांनी लोकांमध्ये कोरोनाची भीती निर्माण केली, याचा फायदा असा झाला, या नियमांचे पालन करण्यात जनता जास्त सावध झाली”, असं भागवत म्हणाले.

“हे संकट संपूर्ण जगावर आहे. त्यामुळे सर्वांनिच आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र काम केलं. स्वत: कोरोना होण्याची शक्यता असतानाही ते संकट घेऊन त्यांनी ते काम केलं. आपल्या घरच्यांपासून महिनामहिनाभर दूर राहून त्यांनी त्यांचं कर्तव्य निभावलं. नागरिकांनीही समाजातील बंधूभगिणींसाठी काम केलं”, असंही ते म्हणाले.

“कोरोनाची निर्मिती चीनमध्ये झाल्याची शंका आहे. पण या काळात चीनने आपल्या सीमेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. आपल्यासोबतच अन्य देशांशीही चीनने युद्धजन्य स्थिती निर्माण केली आहे. तो त्यांचा स्वभाव आहे.”

“पण, लडाखमध्ये भारतीय सैन्यानं चीनला जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यामुळं सामरिक आणि आर्थिक बाबींमध्ये चीनला जोरदार धक्का बसला आहे. अन्य देशांनीही चीनला फैलावर घेतलं आहे. चीनचा विस्तारवाद लक्षात घेता तो पुढे काय करेल माहिती नाही. त्यामुळं सामरिक, आर्थिक, औद्योगिक बाबींमध्ये आपण सक्षम होणं गरजेचं आहे. नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका या शेजारी राष्ट्रांशी संबंध सुधारण्याची, मित्रता टिकवण्याची गरज आहे मतभेत होतात. ते दूर करुन चीनला टक्कर द्यायची असेल तर शेजारी राष्ट्रांशी संबंध चांगले ठेवणं गरजेचं” असंही ते म्हणाले.

“आम्ही मित्रता टिकवतो म्हणजे आम्ही कमजोर नाही. आपली मित्रता कुणाला कमजोरी वाटत असेल अशा राष्ट्रांना आपण जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अशी कुठलीही स्थिती आल्यास आपली तयारी, सावधानी आणि एकता राखली जायला हवी”, असं भागवतांची सांगितलं.

स्वयंसेवकांनी घरीच ऑनलाईन मार्गदर्शन ऐकण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हे मार्गदर्शन ऐकताना पारंपरिक पोषाख परिधान करावा, अशा सूचना स्वयंसेवकांना करण्यात आल्या. शेजाऱ्यांनाही मार्गदर्शन ऐकण्याची विनंती करावी, सोशल सिस्टंसिंग पालवं, अशाही सुचना देण्यात आल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर सणांप्रमाणे यंदा दसरा सणही साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. त्यामुळे राज्यभरात दसरा राज्य सरकारच्या नियमांचे पालन करुन आणि सोशल डिस्टंसिंगची काळजी घेत साजरा केला जाणार आहे.

RSS Vijayadashami Utsav

संबंधित बातम्या :

शिवसेनेचा दसरा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात, 50 जणांच्या उपस्थितीत सोहळा

धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साजरा करा, नागपूर पालकमंत्री नितीन राऊतांचं आवाहन

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *