AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहावीचा पेपर फुटलाच नाही, पेपर फुटल्याच्या बातमीने जयसिंगपूरमध्ये खळबळ, नेमकं काय घडलं?

कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये दहावीचा पेपर फुटल्याच्या बातमीने खळबळ उडाली होती. आज दहावीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाचा पेपर आहे. मात्र पेपरच्या आधाल्या दिवशीच म्हणजेच मंगळवारी रात्री विद्यार्थ्यांना संबंधित विषयाच्या प्रश्नपत्रिका मिळाल्याची बातमी होती. मात्र आता ही बातमी अफवा असल्याचे समोर आले आहे. 

दहावीचा पेपर फुटलाच नाही, पेपर फुटल्याच्या बातमीने जयसिंगपूरमध्ये खळबळ, नेमकं काय घडलं?
संग्रहित छायाचित्र Image Credit source: File Photo
| Edited By: | Updated on: Mar 30, 2022 | 12:58 PM
Share

कोल्हापूर: कोल्हापूरच्या (Kolhapur)  जयसिंगपूरमध्ये (jaysingpur) दहावीचा पेपर (Tenth Exam) फुटल्याच्या बातमीने खळबळ उडाली होती. आज दहावीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाचा पेपर आहे. मात्र पेपरच्या आधाल्या दिवशीच म्हणजेच मंगळवारी रात्री विद्यार्थ्यांना संबंधित विषयाच्या प्रश्नपत्रिका मिळाल्याची बातमी होती. मात्र आता ही बातमी अफवा असल्याचे समोर आले आहे.  प्रत्येक्षात असा कोणताही प्रकार घडलाच नाही. दहावीचा पेपर फुटला नाही. विद्यार्थ्यांकडे असलेला पेपर आणि काल रात्री जो पेपर विद्यार्थ्यांना मिळाला त्यामध्ये बरीच तफावत आढळून आली  आहे. विद्यार्थ्यांकडून पैसे उकळण्याच्या बहाण्याने कोणीतरी हा खोडसाळपणा केला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी अवघ्या पाचशे रुपयांमध्ये या पेपरची विद्यार्थ्यांमध्ये विक्री करण्यात आली होती. दरम्यान पेपरफुटीच्या वृत्ताने काही काळ केंद्रावर तणावाचे वातावरण पहायला मिळाले.

नेमकं काय घडलं?

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये दाहावीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाचा पेपर फुटल्याची अफवा पसरली होती. मंगळवारी रात्री विद्यार्थ्यांना अवघ्या पचशे रुपयांच्या मोबदल्यात आज होणाऱ्या पेपरच्या प्रति वाटण्यात आल्या होत्या. मात्र जेव्हा हे वृत्त समोर आले, तेव्हा खात्री करण्यासाठी पेपर चेक केले असाता दोनही पेपरमध्ये तफावर असल्याचे आढळून आले आहे. केवळ पैसे मिळवण्याच्या उद्देशाने कोणीतरी हा खोडसाळपणा केला असावा असा अंदाज आहे.

परिसरात गोंधळाचे वातावरण

पेपर फुटीचे वृत्त व्हायरल होताचा परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पेपर फुटल्याची बातमी समोर येताच खात्री करण्यासाठी दोनही पेपरची तपासणी करण्यात आली, त्यावेळी दोनही पेपरमध्ये तफावत असल्याचे समोर आले आहे. पेपर फुटीची अफवा असल्याचे समोर आल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

इतर बातम्या

Aurangabad | घरकुल योजनेत श्रेयासाठी डॉ. भागवत कराडांकडून संभ्रम, खासदार इम्तियाज जलील यांचे आरोप काय?

मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या नसा फुटून तरुणाचा मृत्यू, ‘द काश्मीर फाइल्स’ पाहिल्यानंतरची दुर्दैवी घटना

Heat Wave: वाढत्या उन्हाच्या झळा बेतल्या मुक्या प्राण्यांचा जीवावर, उष्मघाताने Baramati मध्ये शेळ्या दगावल्या

Follow Us
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा