AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : नंदी, गणपती दूध पीत असल्याचे अनेक जिल्ह्यात अफवा, मंदिरात भाविकांची तुंबळ गर्दी; वैज्ञानिक कारण असल्याचा अंनिसचा दावा

पालघर मधील बोईसर आझाद नगर येथील शिवमंदिरातील नंदी दूध पीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ झाल्यावर नागरिक सध्या मोठ्या संख्येने मंदिरात गर्दी करत असल्याचे पाहायला मिळाले.

Video : नंदी, गणपती दूध पीत असल्याचे अनेक जिल्ह्यात अफवा, मंदिरात भाविकांची तुंबळ गर्दी; वैज्ञानिक कारण असल्याचा अंनिसचा दावा
मंदिरात भाविकांची गर्दी Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 06, 2022 | 9:45 AM
Share

मुंबई – महाराष्ट्रात (maharashtra) 21व्या शतकात लोक अंधश्रध्देवरती विश्वास ठेवत असल्याने अनेकांना नवल वाटले आहे. कारण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात गणपती आणि नंदी दूध पीत असल्याचे व्हिडीओ (video) भाविकांच्या मोबाईल फिरत असल्याचे निदर्शनास दिसून आले आहे. त्यामुळे अनेकांनी मंदिराची वाट धरली असून तिथं नंदी आणि गणपतीला दूध पाजत असल्याचे व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. नंदी दूध पीत असल्याचे दवे अनेक जिल्ह्यात करण्यात येत असले तरी टीव्ही 9 मराठी याची पुष्टी करत नाही. नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात मंदिरांमधे भाविकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मोबाईलवरती किंवा सोशल मीडियावरती (social media) फिरत असलेले मेसेज आणि व्हिडीओ ही अफवा असल्याचा दावा अंनिसकडून करण्यात आला आहे. तसेच त्याचामागे वैज्ञानिक कारण असल्याचं देखील अंनिसकडून सांगण्यात आलं आहे.

नाशिक जळगावमध्ये सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

नाशिकमध्ये देखील नंदी दूध पीत असल्याच्या अफवेने काही मंदीरात भाविकांची झुंबड उडाल्याची पाहायला मिळाली. नाशिकमध्ये एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक भाविकांनी त्याची खात्री करण्यासाठी मंदीर गाठलं. तर अनेक भाविकांनी मंदीरात जाऊत गणपती आणि नंदीला दूध देखील पाजलं असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. नाशिक, जळगाव, नंदुरबार,धुळेच्या मंदिरांमधे भाविकांची झाली गर्दीचं चित्र आहे. या प्रकारामुळे अनेकांना 27 वर्षापुर्वी गणपती दूध पीत असल्याच्या अफवेची आठवण झाली आहे. हा दैवी चमत्कार नसून, यामागे वैज्ञानिक कारण असल्याचा दावा अंनिसकडून करण्यात आला आहे.

अमरावतीमध्ये नंदी बैल दूध आणि पाणी पीत असल्याचा दावा

अमरावती जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यातील गावातील महादेवाच्या मंदिरातील नंदी बैल दूध आणि पाणी पीत असल्याचा दावा ग्रामस्थाकडून करण्यात येत आहे. नंदीबैल दुध आणि पाणी पीत असल्याचे तसे अनेक व्हिडीओ ही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे, तळेगाव ठाकूर ,अचलपूर सह आदी गावांमध्ये असे प्रकार समोर आले असून नंदी बैलाला दूध पाजण्यासाठी मंदिरात ग्रामस्थांनी गर्दी केली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकारावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही आपली भूमिका मांडली आहे.

पालघर बोईसरमधल्या मंदीरात भाविकांची गर्दी

पालघर मधील बोईसर आझाद नगर येथील शिवमंदिरातील नंदी दूध पीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ झाल्यावर नागरिक सध्या मोठ्या संख्येने मंदिरात गर्दी करत असल्याचे पाहायला मिळाले. हा प्रकार आज संध्याकाळी आझाद नगर येथील शिवमंदिरात घडला आहे. नंदी दूध पीत असल्याची बातमी वाऱ्या सारखी पसरली, पसरल्यानंतर हे अद्भूत दृश्य पाहण्यासाठी आणि नंदीला दूध पाजण्यासाठी नागरिकांनी एकाच गर्दी केली .अनेक लोक हातात दूध घेऊन मंदिर परिसरात जमा झाल्याने या ठिकाणी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. या मागच शास्त्रीय कारण अजूनही स्पष्ट झालं नसल तरी या अद्भुत दृष्याची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी हा प्रकार उघडकीस आला आहे.

काय म्हणते अंधश्रद्धा निर्मूलन समिती.?

यापूर्वी 21 सप्टेंबर 1995 ला देशभरातील गणपती दूध पीत असल्याचा खोटेपणा दिवसभर चालला होता असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अमरावती जिल्ह्याचे सचिव हरीश केदार यांनी म्हटलं आहे. हा प्रकार म्हणजे केशाआकर्षणाच्या नियमातून घडत असल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली आहे. परत 27 वर्षांनी ही खोटी बाब पुन्हा नव्याने करण्यात येत आहे. देव आणि धर्माच्या नावाखाली लोकांच्या भावनांना हात घालून अंधश्रद्धा पसरविण्याचा हा प्रकार असल्याचेही हरीश केदार यांनी म्हटले आहे.

मूर्तीवरून दूध आणि पाणी खाली उतरत आहे

नंदीची मूर्ती पाणी दूध पीत असल्याचा व्हिडिओ सध्या वायरल होतोय. त्यात दगडाची मूर्ती पाणी दूध पीत नाही ते पाणी आणि दुध मूर्ती वरून खाली उतरत आहे. खालील भाग ओला झाल्याचा याचा प्रत्यक्ष पुरावा आहे. चमत्कार होतो यावर विश्वास ठेवणार लोक स्वतःची माझी फसवणूक करत आहे हे समजून घ्यायला पाहिजे असेही केदार यांनी म्हटले आहे.

चमत्कार सिद्ध करा २५ लाख मिळवा

वारंवार अशा अफवांचे प्रकार घडत आहे. जाणीवपूर्वक हे षडयंत्र आहे. सीबीआयने या प्रकाराची चौकशी करावी असा अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान हा चमत्कार सिद्ध करून लेखी आव्हान प्रक्रिया पूर्ण करून 25 लाख रुपये मिळवा हे आव्हान अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती गेल्या अनेक वर्षापासून देत आहे. ज्यांना वाटतं नंदीची मूर्ती पाणी दुध पीत आहे त्यांनी हे आव्हान स्वीकारावं व्हिडिओ व्हायरल करून समाजाची दिशाभूल करू नये जादू विरोधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो असेही हरीश केदार यांनी म्हटले आहे.

Maharashtra News Live Update : नागपुरमध्ये एसटीचे निलंबित 22 कर्मचारी पुन्हा कामावर झाले रुजू

Russia Ukraine War Live : रशिया युक्रेन युद्धाचा 11 वा दिवस, इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी घेतली पुतिन यांची भेट

Modi In Pune Live : पुणेकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक, पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच तास पुण्यात, संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.