Maharashtra News Live Update : माजी नगरसेवक ॲड. नंदू उर्फ भाऊसाहेब घाटे यांचे निधन

| Updated on: Mar 07, 2022 | 10:00 AM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : माजी नगरसेवक ॲड. नंदू उर्फ भाऊसाहेब घाटे यांचे निधन
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9

मुंबई : आज रविवार 6 मार्च 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये एसटीचे निलंबित 22 कर्मचारी पुन्हा कामावर झाले रुजू आहेत अशा विविध बातम्यांचे अपडेट आपण दिवसभरात पाहणार आहोत

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Mar 2022 10:16 PM (IST)

    माजी नगरसेवक ॲड. नंदू उर्फ भाऊसाहेब घाटे यांचे निधन

    माजी नगरसेवक ॲड. नंदू उर्फ भाऊसाहेब घाटे यांचे निधन

    हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुण्यातील विश्वासू सहकारी आणि पुण्यातील शिवसेना वाढीसाठी सिंहाचा वाटा असणाऱ्या शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲड. नंदू उर्फ भाऊसाहेब घाटे यांचे (८९ वर्षे) वृद्धापकाळाने  निधन झाले. पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते. त्यांच्यावर अंत्यसंस्कार उद्या सोमवार दिनांक 7 मार्च 2022 सकाळी 10 वाजता वैकुंठ स्मशानभूमी, नवी पेठ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, चार मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. माजी आमदार विनायक निम्हण यांचे ते सासरे होते

  • 06 Mar 2022 09:54 PM (IST)

    नितीन गडकरी झुंड चित्रपट पाहायला पोहोचले

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पोहचले नागराज मंजुळे सोबत झुंड चित्रपट बघायला .. आज नागराज मंजुळे झुंड च्या प्रमोशन साठी आले होते .. यावेळी गडकरी याना सुद्धा निमंत्रण देण्यात आलं होतं

  • 06 Mar 2022 08:17 PM (IST)

    राज ठाकरे उद्यापासून पुणे दौऱ्यावर

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या चार दिवसीय दौऱ्यासाठी पुण्यात होणार दाखल

    9 तारखेला पुण्यात मनसेचा वर्धापनदिन मेळावा

    लढायचं ते जिंकण्यासाठीच या मथळ्याखाली सगळीकडे वातावरणनिर्मिती

    सोशल मीडीयावर जोरदार मोहीम,

    राज ठाकरे आणि अमित ठाकरे करणार संबोधित

    उद्याच राज ठाकरे पुण्यात दाखल होणार...

  • 06 Mar 2022 08:01 PM (IST)

    वाशिमच्या रिसोड शहरात अवकाळी रिमझिम पाऊस सुरु

    वाशिमच्या रिसोड शहरात अवकाळी रिमझिम पाऊस सुरु...

    या अवकाळी पावसामुळे रब्बीतील गहू,हरबरा ,कांदा पिकाच होणार नुकसान...

  • 06 Mar 2022 07:32 PM (IST)

    पुणे मेट्रोच्या बोगीतील दोन काचांना तडे

    पिंपरी चिंचवड

    -पुणे आणि पिंपरी-चिंचवड च्या मेट्रोचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झालं

    -परंतु, पिंपरी ते फुगेवाडी येथील मेट्रोच्या बोगीतील दोन ठिकाणच्या कांचांना तडे गेल्याच पुढं आले आहे

    -यावरूनच मेट्रो सुरू करण्यास घाई तर केली गेली नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे

  • 06 Mar 2022 06:30 PM (IST)

    भोसरीमध्ये कुस्ती प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन, देवेंद्र फडणवीसांची बैलगाडीतून मिरवणूक

    -पिंपरी चिंचवड मधील भोसरी गावातील मारुती लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्रच उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले

    -ह्यावेळी फडणवीस आले त्यावेळी त्याची बैलगाडी मधून मिरवणूक काढण्यात आली

  • 06 Mar 2022 05:09 PM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने

    पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने

    उद्या उद्घाटन सोहळ्यावेळी प्रकार घडला

    पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार

    देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होतं उद्घाटन

    जोरदार घोषणाबाजी

  • 06 Mar 2022 03:45 PM (IST)

    नवाब मलिक यांची ईडी कोठडी उद्या संपणार

    राकांपा नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना जेजे रुग्णालयात आज ईडी अधिकारी घेऊन गेले होते

    मात्र त्यांना आता पुन्हा ईडी कार्यालयात घेऊन ईडी अधिकारी पोहोचले

    मेडिकल तपासणी साठी मलिक यांना जेजे रुग्णालयात नेलं गेला असल्याची माहिती

    मलिक हे जवळपास 4 तास जेजे रुग्णालयात होते

    उद्या मलिक यांची ईडी कस्टडी संपत असून त्यांना उद्या पुन्हा मुंबई सत्र न्यायालयात रिमांड साठी हजर केला जाणार आहे

  • 06 Mar 2022 02:18 PM (IST)

    विदर्भात उद्योगाची मोठी क्षमता आहे मात्र एकमेकांत ताळमेळ नाही: नितीन गडकरी

    नितीन गडकरी -

    विदर्भ हा मागास भाग असल्याचं सांगितलं जातं

    देशाच्या विकासात सूक्ष्म उद्योग च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे

    त्यासाठी मी मंत्री असताना अनेक नियम बदलले

    विदर्भात 75 टक्के मिनरल आणि 85 जंगल आहे याची मागणी मोठी आहे

    विदर्भात अनेक ठिकाणी मेग्निज आहे त्या ठिकाणी स्टील उद्योगाची मोठी क्षमता त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे

    लॉजस्टिक कोस्ट आपल्या इथे जास्त आहे ते कमी करण्यासाठी उपाययोजना करायची आहे

    डिफेन्स फॅक्टरी च्या मशीन चा वापर करून सीएनजी सिलेंडर बनविले गेले तर त्याची किंमत कमी होऊ शकते

    बांगलादेश 1 नंबर चा रेडिमेड कॉटन गारमेंट एक्पोर्ट देश आहे त्या ठिकाणी विदर्भाचा कापड जातो

    विदर्भात उद्योगाची मोठी क्षमता आहे मात्र एकमेकांत ताळमेळ नाही , जेव्हा की सगळे उद्योग एकमेकांवर आधारित आहे

  • 06 Mar 2022 09:35 AM (IST)

    उस्मानाबादच्या पाडळी गावात मेळाव्याचे आयोजन

    उस्मानाबाद: राष्ट्रवादी काँगेसचा कार्यकर्ता मेळावा

    शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा

    उस्मानाबादच्या पाडळी गावात मेळाव्याचे आयोजन

    मेळाव्याला मंत्री धनंजय मुंडे, राजेश टोपे, संजय बनसोडे यांची उपस्थिती

    थोड्याच वेळात मेळाव्याला होणार सुरूवात

  • 06 Mar 2022 08:53 AM (IST)

    पुण्यातून पसार झालेल्या संशयित आरोपीला कोल्हापूर पोलिसांनी केल जेरबंद

    पुण्यातून पसार झालेल्या संशयित आरोपीला कोल्हापूर पोलिसांनी केल जेरबंद

    मख्खनसिंह कल्याणी असं वाटतं केलेल्या आरोपीचं नाव

    कल्याणी याच्यावर पुण्यात खुनाचा प्रयत्न,दरोडा घरफोडी असे गंभीर गुन्हे आहेत दाखल

    क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी आलेल्या मख्खनसिंह ला पोलिसांनी वेषांतर करत फिल्मी स्टाईल न केलं अटक

    शाहूपुरी पोलिसांची कारवाई

  • 06 Mar 2022 08:15 AM (IST)

    रत्नागिरी- रिफायनरी प्रकल्पासाठी राजापूरवासीयांचा पुन्हा एल्गार

    रत्नागिरी- रिफायनरी प्रकल्पासाठी राजापूरवासीयांचा पुन्हा एल्गार रिफायनरी समर्थनासाठी आज राजापूरात समर्थन मेळावा

    रिफायनरी समर्थनासाठी केलं जाणार जोरदार शक्ती प्रदर्शन रिफायनरी समर्थनासाठी राजापूर तालुक्यात ठिकठिकाणी बॅनर्स प्रकल्पसाठीचे समर्थन शासनापर्यत पोहचवण्यासाठी मेळावा रिफायनरी समर्थन समितीचा सर्व पक्षिय समर्थन मेळावा

  • 06 Mar 2022 08:14 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यात नंदी दूध पीत असल्याची पसरली अफवा

    औरंगाबाद जिल्ह्यात नंदी दूध पीत असल्याची पसरली अफवा

    अनेक गावात नंदी दूध पीत असल्याची पसरली अफवा

    नंदी दूध पीत असल्यामुळे अनेक गावातील मंदिरात झाली गर्दी

    अनेक गावातून नंदी दूध पितानाचे व्हिडीओ होत आहेत व्हायरल

    व्हिडीओ व्हायरल होत असल्यामुळे मंदिरात नागरिकांची गर्दी सुरू

Published On - Mar 06,2022 7:53 AM

Follow us
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.