AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरातसोबतच्या त्या फोटोमागचं सत्य काय? अखेर चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण; गुवाहाटी दौऱ्याविषयी सगळं सांगितलं!

खरातच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. याच चौकशीचा एक भाग म्हणून रुपाली चाकणकर यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने चाकणकर यांची आठ तास चौकशी केली.

खरातसोबतच्या त्या फोटोमागचं सत्य काय? अखेर चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण; गुवाहाटी दौऱ्याविषयी सगळं सांगितलं!
rupali chakankar and ashok kharatImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 14, 2026 | 7:33 PM
Share

Rupali Chakankar : भोंदूबाबा अशोक खरात हा अनेक महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. त्याच्यावर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचार, आर्थिक फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार अशा सर्वच गु्न्ह्यांची चौकशी सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे खरातसोबत जवळचे संबंध असल्याचे समोर आल्यानंतर त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता नुकतेच चाकणकर, त्यांचे कुटंबीय आणि खरात यांचा एक फोटो समोर आला आहे. चाणकर यांनी खरातोसबत गुवाहाटीत देवीचे दर्शन घेतले, असे सांगितले जात आहे. त्यावर आता चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

गुवाहाटीच्या फोटोबाबत चाकणकर काय म्हणाल्या?

खरातच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. याच चौकशीचा एक भाग म्हणून रुपाली चाकणकर यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने चाकणकर यांची आठ तास चौकशी केली. या चौकशीनंतर चाकणकर यांनी माध्यम प्रतिनिधींशी बातचित केली. यावेळी त्यांनी खरात आणि त्यांच्या समोर आलेल्या गुवाहाटीतील फोटोवर स्पष्टीकरण दिलं. गुवाहाटीचा जो फोटो समोर आला आहे त्या फोटोमध्ये खरात आणि माझे कुटुंबीय आहेत. आम्ही खरातसोबत प्रवास केलेला नाही. खरात त्याच्या कुटुंबासोबत, अनेक ट्रस्टींसोबत गुवाहाटीला दर्शनाला पोहोचला होता, असे स्पष्टीकरण चाकणकर यांनी दिले.

आम्ही स्वतंत्रपणे पुण्यातून प्रवास केला

तसेच, यापूर्वी गुवाहाटीला माझ्या कुटुंबाने देवीचे दर्शन घेतलेले नव्हते. त्यामुळे आपल्याला आपल्या गुरुसोबत देवीचं दर्शन करता आलं तर छान होईल, असा अध्यात्मिक भाव ठेवून आम्ही स्वतंत्रपणे पुण्याहून प्रवास करून गेलो होतो. त्यानंतर गुवाहाटीत आम्ही सोबत देवीचं दर्शन घेतलं होतं,असेही चाकणकर यांनी सांगितले.

खरात त्यावेळी अनेक…

खरातचा पुढचा प्रवास त्याच्या लोकांसोबत होता. खरात त्यावेळी अनेक लोकांसोबत, त्याच्या कुटुंबीयांसोबत तिथे आला होता. आपण अनेक ठिकाणी देवाच्या दर्शनाला जातो. गुवाहाटीतही आमचा तोच अध्यात्मिक भाव होता. अनेक क्षेत्रातील लोक त्याचे दर्शन घ्यायचे. त्याला गुरू मानायचे. तीच आमची भावना होती. त्याच्यावर आम्ही प्रामाणिक श्रद्धा ठेवली होती, असे चाकणकर यांनी सांगितले.

Follow Us
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द