AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुपाली चाकणकरांना ईडीचे समन्स? भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण भोवणार

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले असून ७० कोटींच्या कथित खंडणी रॅकेटप्रकरणी त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.

रुपाली चाकणकरांना ईडीचे समन्स? भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण भोवणार
rupali chakankar
| Updated on: May 12, 2026 | 11:28 AM
Share

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातची वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सखोल चौकशी सुरू आहे. याच प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत मोठी भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रुपाली चाकणकर यांची दोन दिवसांपूर्वीच विशेष तपास पथकाद्वारे (SIT) साडेपाच तास चौकशी करण्यात आली होती. आता या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) उडी घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने रुपाली चाकणकर यांना समन्स बजावले असून लवकरच त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

नाशिकचा भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याने एक मोठे खंडणी रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. या रॅकेटच्या माध्यमातून त्याने ७० कोटी रुपयांहून अधिक रक्कम गोळा केल्याचा संशय आहे. ही मोठी रक्कम वळवण्यासाठी त्याने अनेक बेनामी बँक खाती वापरली होती. याच प्रकरणात रूपाली चाकणकर यांचे नाव समोर आले आहे. आता त्यांचा या आर्थिक व्यवहारांशी काही संबंध आहे का, याचा तपास यंत्रणा करत आहेत.

आतापर्यंत काय घडले?

त्यातच आता दोन दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये SIT ने रूपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी केली. यावेळी त्यांच्याकडून विविध कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. SIT च्या चौकशीनंतर आता ईडीने रुपाली चाकणकर यांना समन्स (नोटीस) बजावले आहे. याचा अर्थ आता केंद्रीय यंत्रणा या प्रकरणातील मनी लाँड्रिंग, पैशांचा बेकायदेशीर वापर यांसह विविध गोष्टींची चौकशी करणार आहे.

रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा वापर करून काही संशयास्पद आर्थिक व्यवहार करण्यास मदत केली का? ‘शिवनिका’ नावाच्या संस्थेतील त्यांचा सहभाग आणि त्या माध्यमातून झालेले आर्थिक व्यवहार आता रडारवर आहेत. अशोक खरातने जमवलेल्या ७० कोटींच्या खंडणीत चाकणकर यांचा काही हिस्सा होता का किंवा ही रक्कम वळवण्यासाठी त्यांनी मदत केली का? या प्रकरणाचे धागेदोरे इतर राज्यांशी जोडले गेले आहेत का, याचाही शोध ईडी घेणार आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, SIT आपला चौकशी अहवाल लवकरच ईडीला सादर करणार आहे. जर या चौकशीत ठोस पुरावे सापडले, तर रूपाली चाकणकर यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. ऐन राजकीय घडामोडींच्या काळात केंद्रीय यंत्रणेने या प्रकरणात प्रवेश केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Follow Us
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा; म्हणाले, आजचं फोडाफोडीचं...
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश... आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल...
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?