दिवसभर अपघातांचं सत्र, पुण्यातील अपघात रोखायचे कसे? सुप्रिया सुळे गडकरींना भेटणार

पुणे अपघातांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:34 PM, 12 Jan 2021

पुणे :  पुणे शहरात काल अपघाताचं सत्र पाहायला मिळालं. सोमवारी पुण्यात चार अपघात झाले. या चार अपघातात एकूण दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण जखमी झाले आहेत. यामध्ये घटनास्थळाची पाहणी करणाऱ्यासाठी जाणाऱ्या पोलिसांच्या दोन वाहनालाही अपघात झाला. यामध्ये चार पोलीस कर्मचारीही जखमी झाले. या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ट्राफिक समस्येचं केंद्र बनलेल्या कात्रज चौक ते नवले पूल या रस्त्याच्यासंदर्भात चर्चा केली. (Rupali Chakankar meet Pune Collector Over Pune Road Accident)

पुण्यात वारंवार अपघात होत असलेल्या आणि ट्राफिक समस्येचं केंद्र बनलेल्या कात्रज चौक ते नवले पूल या रस्त्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्याशी चर्चा केली. स्वतः खा. सुप्रियाताई सुळे वारंवार पाठपुरावा करीत आहेत तरीही हे काम अद्याप पुर्ण झाले नाही. याचा फटका परिसरातील नागरीक व वाहनचालकांना बसत असल्याचं चाकणकर म्हणाल्या.

कात्रज चौक ते नवले पूल या भागात वारंवार अपघात होत आहेत आणि नागरिकांच्या तसंच प्रवाश्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. लवकरच रस्ते खात्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून यासंदर्भात तातडीने लक्ष घालणार असल्याचे सुप्रियाताई यांनी कळवलं असल्याचं चाकणकर यांनी सांगितलं.

या भागातील अतिक्रमण, वाहतुक समस्यांसाठी जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी. म्हणजे एकंदर परिस्थिती जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या  लक्षात येईल. तसंच पुढील कामांचं नियोजन करण्यासाठी त्यांना सोईस्कर जाईल, या दृष्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याचं चाकणकर यांनी सांगितलं.

पुण्यात काल झालेला पहिला अपघात

पुणे बंगळुरू महामार्गावर कात्रज बोगद्याकडून नऱ्हेच्या दिशेने जाताना भूमकर पुलावर आज पहाटे दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. दारुची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भरधाव ट्रकने धडक दिल्याने ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की ट्रकच्या समोरील कॅबिनेटचा चेंदामेंदा झाला आणि यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, 1 जण गंभीर जखमी झाला. तर 2 जण किरकोळ जखमी झाले आहे. यादरम्यान, मृतदेह ट्रकमध्ये अडकून पडले होते. पोलीस अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अडकलेले मृतदेह बाहेर काढले. तसेच जखमींना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं.

दुसरा अपघात

याच अपघातापासून काही अंतरावर स्पेअर पार्ट घेऊन जात असलेला एक आयशरला दुसऱ्या एक वाहन घासून गेल्याने उलटा झाला. या अपघात दोघे किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यामुळे पोलिसांनी तक्रार दाखल झाली नसल्याचे सांगितले. अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला असून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

तिसरा अपघात

नऱ्हे येथील अपघाताची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी जात असताना भरधाव कंटनेरने सिंहगड पोलिसांच्या गाडीला उडविले. यामध्ये पोलिसांच्या गाडीचा चक्काचूर झाला असून ग्रामीण पोलीस दलातील दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले.

चौथा अपघात

नवीन कात्रज बोगदा दरी पुलाकडून साताऱ्याहून-मुंबईकडे जाणाऱ्या आणखी एका कंटेनरने 4 वाहनांना उडवले. यामध्ये एका रिक्षा आणि पोलिसांच्या गाडीचा चुराडा झाला. या अपघातात सहा महिन्यांच्या बाळासह तीन जण जखमी झालेत. जखमींमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

(Rupali Chakankar meet Pune Collector Over Pune Road Accident)

संबंधित बातम्या

Pune Accident | सोमवार की अपघातवार; पुण्यात एकापाठोपाठ चार अपघात