10 हजार भरले, आणखी लाख रुपये आणायचे कुठून, 89 टक्के मिळालेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या

शिक्षणाची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने हतबल विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात घडला. रुपाली रामकृष्ण पवार (Rupali Pawar suicide) असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

10 हजार भरले, आणखी लाख रुपये आणायचे कुठून, 89 टक्के मिळालेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या
Follow us
| Updated on: Jul 24, 2019 | 2:17 PM

सोलापूर : शिक्षणाची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने हतबल विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात घडला. रुपाली रामकृष्ण पवार (Rupali Pawar suicide) असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती मोहोळ तालुक्यातील देगावची रहिवासी होती. रुपालीने कीटकनाशक प्राशन करुन आयुष्य संपवलं.

रुपाली रामकृष्ण पवार हिचा पंजाबच्या  जालिंदर शहरातील लव्हली प्रोफेशनल अकादमीला बीटेकसाठी प्रवेश निश्चित झाला होता. या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सीईटी पात्रता परीक्षेत रुपालीने 89 टक्के गुण मिळवले होते. पंजाब इथे दहा हजार भरून रुपालीने आपला प्रवेश निश्चित केला होता. उर्वरित एक लाख रुपये भरण्यासाठी 20 जुलैची मुदत होती. मात्र मुदतीत फी भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे रुपालीने रात्री उशिरा आपल्या राहत्या घरी कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली.

रुपालीची फी भरण्यासाठी वडिलांनी शेती विकायला काढली होती. मात्र शेतीला कवडीमोल भाव येत असल्याने शेतीची विक्री झाली नाही. त्यामुळे अशी दुर्दैवी वेळ आल्याचं गावकरी  आणि नातेवाईकांच म्हणणं आहे.

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.