AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रायव्हेट पार्टवरून जोक, प्रणित मोरेच्या शोमुळे ट्रोल होणाऱ्या डॉ. सेजल पवारला नीट-यूजीमध्ये मिळाले इतके गुण

प्रणित मोरेच्या शोमध्ये पुरुषांच्या डेडबॉडीच्या प्रायव्हेट पार्ट्सबद्दल अत्यंत खालच्या दर्जाचा विनोद करणाऱ्या सेजल पवारवर सोशल मीडियावर प्रचंड टीका होत आहे. तिने नीट-यूजीमध्ये किती गुण मिळवले होते, ते पाहुयात..

प्रायव्हेट पार्टवरून जोक, प्रणित मोरेच्या शोमुळे ट्रोल होणाऱ्या डॉ. सेजल पवारला नीट-यूजीमध्ये मिळाले इतके गुण
सेजल पवारImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 12, 2026 | 10:54 AM
Share

कॉमेडियन प्रणित मोरेचा शो सध्या विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एकीकडे या शोमध्ये 370 रुपयांच्या बिर्याणीच्या बदल्यात मुलीकडून वसुलीची भाषा करणारा तरुण सर्वांच्या निशाण्यावर आला आहे. तर दुसरीकडे याच शोमध्ये पुरुषाच्या मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबद्दल अश्लील टिप्पणी केल्यामुळे सेजल पवार ही एमबीबीएस विद्यार्थिनी चर्चेत आली आहे. डॉ. सेजल पवारच्या आक्षेपार्ह टिप्पणीची दखल घेऊन केईएम रुग्णालय प्रशासनाने तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. तर समितीला शुक्रवारपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र सायबर पोलिसांनी प्रणित मोरेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

370 रुपयांच्या बिर्याणीच्या व्हिडीओनंतर कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमधील आणखी एक व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी सेजल पवार ही पुरुषांच्या मृतदेगांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विनोद करताना दिसतेय. या व्हायरल व्हिडीओमध्ये सेजल यात म्हणते की, मेडिकल रिसर्च आणि डिसेक्शनसाठी कॉलेजला (केईएम हॉस्पिटल, मुंबई) दान केलेल्या पुरुषांच्या मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टकडे पाहून ती आणि तिचे सहकारी त्यांची खिल्ली उडवत असत. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. इतकंच नव्हे तर सेजलचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याचीही मागणी केली जात आहे.

सेजलचं शिक्षण किती, नीट-यूजीमध्ये किती गुण?

सेजल पवारने नीट-यूजी (NEET – UG) या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत 720 पैकी 406 गुण मिळवले आहेत. डॉक्टर होण्यासाठी तिने 2022 मध्ये मुंभईती सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटलमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तिला राखीव कोट्यातून प्रवेश मिळाला असून बारावीत तिला इंग्रजीमध्ये 100 पैकी 87 गुण मिळाले होते. तिने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यांमध्ये 300 पैकी 190 गुण मिळवले होते.

सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल हे बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे चालवले जाणारे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आहेत. सर्वसाधारणपणे नीट-यूजीमध्ये 600 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश दिला जातो.

प्रणित मोरेच्या शोमध्ये सेजलने जे वक्तव्य केलं, त्यावर डॉक्टरांनी, विशेषत: महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सच्या सदस्यांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा बेजबाबदार वक्तव्यांमुळे लोकांमध्ये डॉक्टरांची प्रतिमा मलिन होते आणि रुग्णांचा डॉक्टरांवरील विश्वास कमी होतो, असं त्यांनी म्हटलंय. याप्रकरणी सेजल पवारने जाहीर माफी मागितली आहे. तिने स्पष्ट केलं की तो तिचा पहिलाच कॉमेडी शो होता आणि महिन्याभरापूर्वी तिने जे काही म्हटलं होतं, त्याचा इतका मोठा मुद्दा बनेल, याची तिला कल्पना नव्हती.

Follow Us
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय