AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन अहिर यांचा अवघ्या दोन तासात उद्धव ठाकरे यांना सलग दुसरा मोठा झटका, आता थेट…

Sachin Ahir : सचिन आहिर यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांचा हात पकडला आहे. दोन आठवड्यात दुसरा मोठा धक्का एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना देण्यात आला. 6 खासदारांच्या फुटीनंतर हा थेट दणका आहे.

सचिन अहिर यांचा अवघ्या दोन तासात उद्धव ठाकरे यांना सलग दुसरा मोठा झटका, आता थेट...
Sachin Ahir and Uddhav Thackeray
| Updated on: Jun 30, 2026 | 1:45 PM
Share

शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी थेट सचिन आहिर यांनी अर्ज भरला. सचिन आहिर यांनी अर्ज भरला त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते. सचिन आहिर हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते होते. एकनाथ शिंदेंच्या गळ्याला सचिन आहिर लागले. शिवसेना ठाकरे गटाचा हात सोडून थेट सचिन आहिर यांनी एकनाथ शिंदेंचा हात पकडल्याने हा उद्धव ठाकरेंना मोठा झटका आहे. उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांच्या मतदार संघात सभा घेण्यामध्ये व्यस्त असताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा मोठा गेम केला. दोन आठवड्यांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार फोडले. त्यानंतर आज एक आमदार शिंदेंच्या गटात जातोय. अजूनही राज्यात ऑपरेशन टायगर सुरू आहे. काही आमदार अजूनही एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.

आता सचिन आहिर यांनी अवघ्या 2 तासात उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा झटका दिला. सचिन अहिर यांनी कामगार सेनेच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. सचिन आहिर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठवला आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले की, भारतीय कामगार सेनेच्या तसेच अध्यक्ष बेस्ट कामगार सेना या पदांवर कार्यरत आहे.

आपण माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि उपरोक्त पदांवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले व पक्षाचे मन:पूर्वक आभारी आहे. तथापी, मी काही अपरिहार्य कारणास्तव मी भारतीय कामगार सेनेचा व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पदांचा राजीनामा देत आहे. तरी आपण माझा हा राजीनामा करावा. आपण दाखविलेला विश्वास व प्रेम कायम असेच राहवे, ही नम्र विनंती असे त्यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे.


Sachin Aher

सचिन आहेर अशाप्रकारे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील आणि त्यांना थेट विधान परिषदेच्या उपसभापतीची संधी मिळेल, याचा साधा विचारही कोणी केला नव्हता. यादरम्यानच राज्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही वेळातच पत्रकार परिषद घेणार आहेत.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर